मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकरांसाठी चक्क 'बिग बॉस'देखील थांबले

Varsha Usgaonkar: मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळणार आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 1 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात १६ महारथी दाखल झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचं खरं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळणार आहे.

घर म्हटलं की एकत्र नांदता नांदता भांड्याला भांड लागतंच. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरातही सदस्यांमध्ये 'तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात वर्षा ताई मेकअप करताना दिसून येत आहेत. दरम्यान निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते,"तुम्ही कृपया नंतर मेकअप करा". त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,"मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे... तू व्यवस्थित तयार झालीस". पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते,"लिपस्टिक नंतर लावा..आधी बाहेर येऊन बसा..लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही...".

घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर 'बिग बॉस' आदेश देणार आहेत. त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व सदस्य बेडरुमध्ये मेकअप करणाऱ्या वर्षांताईंना बाहेर बोलवताना दिसत आहेत. तुमच्यामुळे 'बिग बॉस'देखील थांबलेत असं घरातील इतर सदस्य वर्षाताईंना म्हणत आहेत. आता वर्षाताई लिव्हिंग एरियामध्ये आल्यावर 'बिग बॉस' काय आदेश देणार हे जाणून घेण्यास 'बिग बॉस'प्रेमी उत्सुक आहेत.

AI मुळे नोकरीबाबत अनिश्चितता; तरुण-धोरणकर्त्यांमध्ये संवादाची गरज; नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा सल्ला

"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO