ColorsMarathi
मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात दुसऱ्याच दिवशी निक्की तांबोळी 'या' सदस्यावर झाली फिदा

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 2 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी रितेश भाऊसमोरच स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलवर (Arbaz Patel) फिदा झालेली दिसून आली. आता दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला 'बिग बॉस'ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो,"बिग बॉस' आमच्या वहिनींचं तरी ऐका...". त्यावर अरबाज त्याला म्हणतो,"थांबरे सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू..". पुढे छोटा पुढारी म्हणतो,"तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय.. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही". छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होतं..अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो,"प्रेमात असचं असतंय 'बिग बॉस'. छोटा पुढारीमुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात हास्य कल्लोळ होतो.

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. रितेश भाऊलाही निक्की थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं असं म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, निक्कीला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता". त्यामुळे आता 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे 'बिग बॉस'प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री काँग्रेसचाच! बाळासाहेब थोरात यांचा दावा

‘मेट्रो-३’ला नवा मुहूर्त! पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेवेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार

खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येप्रकरणी भारत सरकारला अमेरिकन न्यायालयाने पाठवले समन्स

राज्यात तिसरी आघाडी! पुण्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ची घोषणा; छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय

संकटमोचक अश्विन! झळकावले कसोटीतील सहावे शतक, बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सावरला भारताचा डाव