बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरमधील 'अनेक दरवाजे' पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला  
मनोरंजन

बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरमधील 'अनेक दरवाजे' पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला रिऍलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्याच्या तयारीत आहे. या शोची चाहूल लागताच महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा रंगू लागतात. कोण येणार? घर कसं असणार? थीम काय असणार?

Krantee V. Kale

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला रिऍलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्याच्या तयारीत आहे. या शोची चाहूल लागताच महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा रंगू लागतात. कोण येणार? घर कसं असणार? थीम काय असणार? अशा शेकडो प्रश्नांची लगबग सुरू होते आणि प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जाते. आता पुन्हा त्या घराचा दरवाजा उघडणार आहे आणि एंटरटेनमेंटचा बार आधीपेक्षा जास्त उडणार हे निश्चित.

टीझरमधील ‘अनेक दरवाजे’ चर्चेत

या सीझनचा पहिला संकेत देत कलर्स मराठीने एक खास टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरमध्ये यावेळी एका दरवाज्याऐवजी अनेक दरवाजे दिसतात आणि नेमका हाच भाग प्रेक्षकांची उत्सुकता सर्वाधिक वाढवतो. दारांमधून येणारा प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि निर्माण होणारे रहस्यमय वातावरण पाहून या वर्षीचे ट्विस्ट काहीतरी वेगळंच असणार हे जणू स्पष्ट होते. टीझर कोणतीही ठोस माहिती न देता प्रेक्षकांना थेट गुंतवून ठेवतो आणि संपूर्ण सीझनबद्दल अधिकाधिक प्रश्न निर्माण करतो.

सिझनबद्दलची माहिती अजूनही गुप्त

या वेळचा USP काय असेल, घराची रचना कशी असेल, सदस्य कोण असतील, गेमची रणनीती कशी बदलणार हे सर्व अजूनही गुलदस्त्यात आहे. शोची टीम सध्या सर्व माहिती गुप्त ठेवत असून, योग्य वेळ येताच प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने उलगडली जाणार आहे.

रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार?

सूत्रसंचालनाबाबतही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचा लाडका भाऊ, रितेश देशमुख, पुन्हा सूत्रसंचालन करणार का? “भाऊचा कट्टा” पुन्हा एकदा घराघरात झळकणार का? या प्रश्नांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहेत.

लवकरच उलगडतील सदस्यांची नावे आणि घराचा पहिला लूक

लवकरच सदस्यांची नावे, घराचा पहिला लूक, सीझनची अधिकृत थीम आणि यंदाचे प्रमुख ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येणार आहेत. “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्रभर घुमण्याची तयारी झाली असून, मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

"रवींद्र चव्हाण आल्यानंतर काय होतं?" मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंची धाड; Live व्हिडिओतून पोलखोल

'बॉम्बे'वरून मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका; "काहीजण आपल्या मुलांना..."

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

Mumbai : 'बॉम्बे'ची 'मुंबई' कधी झाली? काय आहे या नावामागची गोष्ट? जाणून घ्या