मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज रंगणार 'कॅप्टनसी टास्क'; कोणाला मिळणार पहिला कॅप्टन होण्याचा मान?

Captaincy Task: आज रात्री 'बिग बॉस मराठी'च्या नव्या एपिसोडमध्ये रंगलेली पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये कॅप्टन बनण्यासाठी एक टास्क आयोजित करण्यात येईल.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 10 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनसी कार्य आयोजित करण्यात आलं आहे. घरामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशीच एक स्पर्धा आज रात्री 'बिग बॉस मराठी'च्या नव्या एपिसोडमध्ये रंगलेली पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये कॅप्टन बनण्यासाठी एक टास्क आयोजित करण्यात येईल.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा आजच्या भागाचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोवरुन 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य कॅप्टन होण्यासाठी टास्कमध्ये धडपड करताना दिसून येत आहेत. या बुलेट ट्रेनमध्ये एक सीटसाठी रेटारेटी होताना देखील पाहायला मिळत आहे. या टास्कमुळे नव्या सीझनमधील घराचा पहिला कॅप्टन मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टन होणं अत्यंत मानाचे मानले जाते. आता बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या भागात याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे आजचा भाग विशेष रंजक ठरणार आहे.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल