मनोरंजन

'गदर २' सिनेमावर सेन्सॉरची कात्री, सुचवले तब्बल दहा बदल

नवशक्ती Web Desk

ऑगस्ट महिन्यात बहुचर्चित असलेले दोन चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ११ ऑगस्ट या दिवशी सनी देओल व अमीषा पटेलचा यांचा 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या दोन चित्रपटांची अफाट चर्चा सध्या आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 'ओह माय गॉड २' या चित्रपटाला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट' मिळालं असून काही किरकोळ बदलही त्यात सुचवले गेले आहेत. यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

आता 'गदर २' ला देखील सेन्सर बोर्डाने काही बदल सुचवले आहेत. गदर या चित्रपटाच्या पहिल्या भागाशी प्रेक्षकांच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे याच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 'गदर २' ला सेन्सॉर बोर्डने दहा कट्स सुचवले आहेत. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार 'गदर २' या चित्रपटाला 'यू/ए सर्टिफिकेट' दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

सिनेमातील एका सीनमध्ये दंगेखोरांच्या तोंडून निघालेला 'हर हर महादेव' हा संवाद हटवण्यात आला आहे. येवढंच नव्हे तर चित्रपटात 'बास्टर्ड' काढून 'इडियट' हा शब्द वापरण्यात आला आहे. चित्रपटात रक्षामंत्री यांचं नाव देखील बदलण्यात आलं आहे. 'तिरंगा' हा शब्दही चित्रपटातून काढण्यात आला असल्याचं स्पष्ट झालं आहे. असे बरेच वेगवेगळे तब्बल १० बदल या चित्रपटात सुचवले गेले आहेत. 'गदर २' या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे 'शो' बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाची १४ हजारहून जास्त तिकीटं विकली गेली असल्याचंही सांगितलं जात आहे.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास