मनोरंजन

'या' मराठी अभिनेत्रीची प्राजक्ता माळी आहे लेडी क्रश

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीची प्राजक्ता लेडी क्रश आहे

वृत्तसंस्था

प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारूपास येत आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे प्राजक्ताचे फॅन फॉलोविंग प्रचंड संख्येने आहेत. असंख्य मुलांची ती ड्रीमगर्ल आहे. त्याच जोडीने अनेक मुलींनाही ती आवडते. परंतु आता एक अशी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीची प्राजक्ता लेडी क्रश आहे.

तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कोण आहे ही अभिनेत्री? तर ही अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे. प्राजक्ता ऋतुजाची लेडी क्रश आहे आणि ही गोष्ट तिने प्राजक्तासमोर मान्य केली आहे. ऋतुजाला प्राजक्ताची लेस्बियन पार्टनर व्हायला आवडेल, हे सिक्रेट ऋतुजाने प्राजक्ता माळी आणि अख्या जगासमोर उघड केले आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे, हे तुम्हाला प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये शुक्रवारच्या म्हणजेच २४ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

या टॉक शोमध्ये प्राजक्ता माळीने शाहरुख खानसोबतचा एक किस्साही शेअर केला. ती एसआरकेला तब्बल १७ वेळा धडकली होती. आता ते कशासाठी हेसुद्धा प्राजक्ताने या शोमध्ये सांगितले आहे. ऋतुजाला एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान ५१ हजार रुपयांचा चेक देण्यात आला होता. आता तो कोणता प्रयोग होता आणि हा चेक तिला का मिळाला? असे अनेक कायम स्मरणात राहणारे किस्से ऋतुजानेही शेअर केले आहेत.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?