मनोरंजन

दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांच्या हक्कांचा वाद हायकोर्टात

नवशक्ती Web Desk

चित्रपट अभिनेते-निर्माते दिवंगत दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांच्या कॉपीराईटसह संबंधित इतर सर्व हक्क पुढील आदेशापर्यंत 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दादा कोंडके यांच्या ट्रस्टला दिले. चित्रपटांच्या हक्कांवर दावा करीत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हे आदेश देताना एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला अंतरिम दिलासा दिला.

दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांच्या हक्कांसदर्भात एव्हरेस्ट एंटरटेनमेंट लिमिटेडने दादा कोंडके यांच्या नावाने असलेल्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल