मनोरंजन

धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर रिलीज ; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आज दाक्षिणात्य सूपरस्टार धनुषचा वाढदिवस असल्याने त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवशक्ती Web Desk

दाक्षिणात्य सिनेमे, त्यांची कथा, अॅक्शन आणि चित्रपटातील कलाकार यांची सध्या सर्वत्र क्रेझ आहे. त्यांच्यापैकी एक असलेला साऊथचा सुपरस्टार धनुषचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर शूभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेमकं आजचं त्यांच्या 'कॅप्टन मिलर' (Captain Miller)या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये धनुषचा हटके लुक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

'कॅप्टन मिलर' (Captain Miller)या सिनेमाच्या टीझरमध्ये धनुष हा अॅक्शन अंदाजात दिसून येत आहे. या अवघ्या १ मिनीट ३३ सेकंदाच्या टीझरने धनुषच्या चाहत्यांना भूरळ पाडली आहे. 'कॅप्टन मिलर' हा ब्रिटीश सैन्याच्या दृष्टीने एक गुन्हेगार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केलं आहे. त्यांनी यापूर्वी 'रॉकी' आणि 'सानी कायधाम' यांसारखे या चित्रपटांचं देखील दिग्दर्शन केले आहे. 'कॅप्टन मिलर' हा सिनेमा १५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

'कॅप्टन मिलर' या सिनेमात सुपरस्टार धनुषसोबत सुदीप किशन, एलंगो कुमारवेल, नासर, एडवर्ड सोनेनब्लिक, विजी चंद्रशेखर, निवेधिथा सतीश, जॉन कोककेन, विनोथ किशन, बाला सरवनन, सुमेश मूर या कलाकारांची देखील भूमिका आहेत. धनुषने काही दिवसांपूर्वी त्याच्या 'कॅप्टन मिलर' सिनेमातील लुकचा फोटो शेअर केला होता. यावर त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला होता.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक