मनोरंजन

'आदिपुरुष' सिनेमातील संवाद वादात ; संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना सुरक्षा

सिनेमावर बंदी आणण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे

नवशक्ती Web Desk

आदिपुरुष हा सिनेमा सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. आता या सिनेमातील संवादावरुन नवा वाद समोर आला आहे. या सिनेमातील संवाद रामायणाचा अनादर करणारे आहेत. यावरुन प्रेक्षक चांगलेच भडकल्याचं दिसत आहे. या सिनेमाचे संवाद लेखक यांनी संवादाला होणारा विरोध बघून ते आठवड्याभरात बदलण्यात येतील असं सांगितलं. तसंच याप्रकरणातील वाढता विरोध बघता त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी देखील मनोज मुंतशीर यांना सुरक्षा पुरवली आहे.

आदिपुरुष हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर संवादावरुन वाद वाढत चालले आहेत. काल नालासोपारा येथे काही हिंदू संघटनांनी सिनेामाचा शो बंद पाडला. दुसरीकडे सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. तरीदेखील या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. अनेक प्रेक्षक या सिनेमात कलाकारांची निवड, व्हीएपएक्स असो किंवा संवाद सगळच गंडलं असल्याचं म्हणत आहे.

'आदिपुरुष' हा सिनेमा १६ जून रोजी रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ८६.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र, दुसऱ्या दिवसाच्या कमाईत कमालीची घट झाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ६५.२५ कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने भरारी घेत ६७ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसात सिनेमाने २१९ कोटी रुपये कामावले आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी