मनोरंजन

Har Har Mahadev : 'तुम्ही जर स्वतःला शिवभक्त म्हणवता,तर...'; दिग्दर्शकाचे जितेंद्र आव्हाडांना जशास तसे उत्तर!

'हर हर महादेव'वरून (Har Har Mahadev) होणाऱ्या वादावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे (Abhijeet Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.

प्रतिनिधी

ठाण्यातील विवियाना मॉलच्या थिएटरमध्ये जाऊन 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) चित्रपटाचे शो राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. एवढेच नव्हे, तर तेथील एका प्रेक्षक मारहाणदेखील करण्यात आली. या प्रकरणावर आणि होत असलेल्या आरोपांवर दिग्दर्शक अभिजीत देशपांडे (Abhijeet Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. त्यांनी हा सर्व प्रकार लांच्छनास्पद असल्याचे म्हंटले आहे. 'तुम्ही जर स्वतःला शिवरायांचे भक्त म्हणवतो तर आपण त्यांनी दिलेल्या शिकवणूकीनुसार वागले आहे.' असे म्हणत त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत म्हंटले की, "काळ जो प्रकार घडला तो लाच्छंनास्पद आहे. मी या प्रकरणाचा निषेध करतो. आपण जर स्वतःला शिवरायांचे भक्त म्हणवतो तर आपण त्यांनी दिलेल्या शिकवणूकीनुसार वागायला हवे. माझ्या चित्रपटावर जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत, त्या गोष्टींचे पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डाला दिलेले आहेत. त्यामुळेच आमच्या चित्रपटाला त्यांनी सर्टिफिकेट दिलेले आहे."

पुढे अभिजीत देशपांडे यांनी सांगितले की, "जे आरोप केले जात आहेत, ते अत्यंत चुकीचे आहेत. काही शंका सेन्सॉर बोर्डानेही आम्हाला विचारल्या होत्या. अनेक पुस्तकांचा, बखरींचा अभ्यास करून या गोष्टी दाखवल्याचे पुरावे आम्ही त्यांना दाखवले आहेत. १९०५ मध्ये केळुस्करांच्या एका पुस्तकामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. असेच पुरावे आम्ही दिले आहे."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र केले होते. माणुसकीचा संदेश दिला होता. पण सध्या त्यांचे विचार बाजुला ठेवून राजकारण केले जात आहे. या सर्व प्रकारावर वाईट वाटते. तुम्ही चित्रपट पहा, त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही." असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय