दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया झाले जुळ्या मुलांचे आई-बाबा; "मेरे करन-अर्जुन आ गए" म्हणत दिली गोड बातमी (Photo-Instagram)
मनोरंजन

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया झाले जुळ्या मुलांचे आई-बाबा; "मेरे करन-अर्जुन आ गए" म्हणत दिली गोड बातमी

दिव्यांका आणि विवेक यांनी १९ मार्च रोजी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी जुळ्या मुलांच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. या दाम्पत्याने जुळ्या मुलांचं स्वागत केलं असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

दिव्यांका आणि विवेक यांनी १९ मार्च रोजी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी जुळ्या मुलांच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

"मेरे करन अर्जुन आ गए" म्हणत शेअर केली पोस्ट

आपल्या पोस्टला मजेशीर बॉलिवूड टच देत या नव्या आई-वडिलांनी "मेरे करन अर्जुन आ गए" असं लिहिलं. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

पोस्टमध्ये त्यांनी, "We asked for happiness... God said, 'Take double.' Blessed with twin baby boys," असं कॅप्शन दिलं आहे.

खास फोटोने वेधलं लक्ष

या घोषणेसोबत त्यांनी एक आकर्षक ग्राफिकही शेअर केलं. त्यामध्ये निळ्या रंगाच्या मॅचिंग कपड्यांमध्ये दोन बाळं ढग आणि तार्‍यांच्या सजावटीमध्ये बसलेली दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

ही पोस्ट शेअर होताच चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. माही विज, हितेन तेजवानी, युविका चौधरी, करिश्मा तन्ना, जेमी लीव्हर, डेलनाझ इराणी आणि मोनालिसा यांसारख्या कलाकारांनी कमेंट करत या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

'ये है मोहब्बतें'च्या सेटवर झाली होती ओळख

दिव्यांका आणि विवेक यांची पहिली भेट लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बतें'च्या सेटवर झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी ८ जुलै २०१६ रोजी भोपाळमध्ये खासगी समारंभात लग्न केलं होतं.

चाहत्यांना बाळांच्या पहिल्या फोटोची उत्सुकता

जुळ्या मुलांच्या आगमनानंतर आता चाहत्यांना त्यांच्या दोन्ही बाळांची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

एअरपोर्टकडे निघालेल्या महिला केबिन क्रूवर बलात्कार; २३ वर्षीय कॅब चालक अटकेत

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत