PM
मनोरंजन

शाहरुखचा बहुप्रतिक्षित 'डंकी' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

रिलिज होताच शाहरुखचा 'डंकी' सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय.

Swapnil S

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर धमाकेदार एंट्री केली आहे. 'जवान' आणि 'पठाण'नंतर आता शाहरुखचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'डंकी' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील अनेक दिवसांपासून शाहरुख आणि दिग्दर्शक राज कुमार हिरानी यांचे चाहते या चित्रपटाची फार आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला आहे. रिलिज होताच शाहरुखचा 'डंकी' सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय.

'डंकी' एक भावनिक रोलर कोस्टर-

जगभरातील चाहते या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. 'डंकी'चा पहिला शो न्यूझीलंडमध्ये झाला आणि एका प्रेक्षकाने X हँडलवर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. यात त्याने लिहिले आहे की, “पहिला हाफ पूर्ण झाला आहे. 'डंकी' एक भावनिक रोलर कोस्टर आहे. जो तुम्हाला एकाच वेळी हसवेल आणि त्याच क्षणी रडवेल, विकी कौशलची आठवण येईल आणि हो 'हार्डी एक नमुना नाही तर तो किंग खान आहे." यासोबत त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने जुन्या शाहरुखला पुन्हा पडद्यावर आणल्याबद्दल राजकुमार हिरानी यांचे आभार मानले आहे. यासोबतच त्याने सर्वांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “राजकुमार हिरानी यांनी पटकथेचा उत्कृष्ट नमुना परत एकदा भेटीला आणला आहे. पटकथा उत्कृष्ट आहे, अभिनय उत्कृष्ट आहे आणि हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील मास्टरपीसमध्ये नेहमीच मोजला जाईल. दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून, मला वाटत नाही की राजकुमार हिरानी यांच्यापेक्षा कोणीही चांगले काम करू शकेल."

तर अजून एकाने लिहिले की, "गेटी गॅलेक्सीमध्ये डंकीचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल आहे, जनता वेडी झाली आहे. 1000 कोटी लोडिंग. तर, दुसऱ्याने डंकीच्या पहिल्या शोसाठी आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीची झलकही दाखवली आहे." शाहरुख खानचे कौतुक करत अजून एकाने लिहले आहे की, "व्वा. शाहरुख खानच्या कारकिर्दीतील मी पाहिलेला हा सर्वोत्तम चित्रपट आहे, जो मी पाहिला. #डंकी. अप्रतिम कथाकथन, अप्रतिम अभिनय."

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी