मनोरंजन

'गदर २'च्या ट्रेलरने घातला धुमाकूळ ; 24 तासात मिळवले तब्बल 'एवढे' व्ह्यूज

'गदर' हा चित्रपट 2001 साली आला होता. त्यावेळी या चित्रपटाने देशभर हंगामा करत तुफान कमाई केली होती

नवशक्ती Web Desk

अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शीत 'गदर' हा चित्रपट 2001 साली आला होता. त्यावेळी या चित्रपटाने देशभर हंगामा करत तुफान कमाई केली होती. आता 'गदर' चित्रपटानंतर तब्बल 22 वर्षानी 'गदर 2' हा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक उत्सुकतेने त्याच्या ट्रेलरची वाट पाहत होते. या चित्रपटात देखील 'गदर' सिनेमात असलेली सनी देओल आणि अमिषा पटेल याची जोडी दिसून येणार आहे. तसंच उत्कर्ष शर्मा देखील या चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सनी देओल आणि आमिष पटेल यांच्या 'गदर २' या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहात होते. गदर २ या चित्रपटातील गाणी रिलिज करण्यात आली असून या गाण्यानी लोकांच्या मनावर गारुड केलं आहे. प्रेक्षकांनी गाणी आणि टीझरला डोक्यावर घेतलेलं पाहुन निर्मात्याने 'गदर 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलिज केला. 'गदर २' चा ट्रेलर हा कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर म्हणजेच बुधवारी ( 26 जुलै) युट्युबवर रिलिज करण्यात आला आहे. टीझर प्रमाणेच या चित्रपच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा भरभरून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

'गदर २' या चित्रपटाचा टीझर रिलिज होताच त्या टीझर ने २४ तासात मोठा रेकॉर्ड बनवला होता, आता 'गदर २'च्या ट्रेलरने रिलीज झाल्यानंतर २४ तासाच्या आत ५० मिलियन व्ह्यूज मिळवले आहे. 24 तासात सर्वात जास्त पाहिलेल्या हिंदी चित्रपटांच्या ट्रेलरच्या लिस्टमध्ये 'गदर 2' या चित्रपटाचा सामावेश झाला आहे. अभिनेता सनी देओल याची मुख्य भूमिका असलेला 'गदर २' चित्रपटाचा ट्रेलर लोकांना आवडला असून या ३ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये सनी देओल म्हणजेच तारा सिंग हा डॅशिंग रूपात पाहायला मिळत आहे. 'गदर २'च्या ट्रेलरमध्ये तारा सिंग हा त्याचा मुलाला सोडवायला पाकिस्तनामध्ये जातो तिथे जाऊन त्याने चांगलाच कहर केलेला दिसून येत आहे. तसंच पाकिस्तानच्या आर्मीवर तो हल्ला करतांना दिसत आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी