बॉलिवूडचा खिलाडी असलेल्या अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लैंगिक शिक्षण हा मुद्दा आणि त्याचे महत्व या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक अक्षयनं या अगोदर अनेक चित्रपटांमधून विविध सामाजिक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यात 'पॅडमन', 'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटांचा उल्लेख केला जातो
'गदर' चित्रपटातील गाणी ही खूप लोकप्रिय झाली होती. त्याला मिळणारा प्रतिसादही खूप मोठा होता. 'गदर २' मध्ये देखील पहिल्याच भागातील गाणी पुन्हा नव्या अंदाजात सादर करण्यात आली आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं मोठ्या खुबीनं ती प्रेक्षकांसमोर आणली आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे मात्र, अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' मध्ये 'गदर' चे गाणं ऐकू आल्यामुळे चाहत्याना सुखद धक्काचं बसला आहे.
'ओह माय गॉड २' मध्ये अक्षयने महादेवाची भूमिका साकारली आहे. त्यामध्ये कांतीलालच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी देखील आहे. यावेळी एका सीन मध्ये महादेव झाडाखाली बसून सनीच्या 'गदर' चित्रपटातील 'तू घर आजा परदेसी तेरी मेरी एक जिंदगी' हे गाणं म्हणताना दिसतात. ते गाणं ऐकून पंकज त्रिपाठी दिलखुलासपणे आपली प्रतिक्रिया ही देतो. या सीन चे काही क्लिप्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्या आहेत. सोशल मीडियावर आलेल्या त्या क्लिप्सनं चाहत्यांनी दोन्ही अभिनेत्यांचं कौतूक केलं आहे. याशिवाय अक्षय कुमारने साकारलेल्या महादेवाच्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. बॉक्स ऑफिसवर 'ओह माय गॉड २' आणि 'गदर २' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असून हे दोन्ही चित्रपट एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. त्यात कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे.