मनोरंजन

"...तर यापुढे मी कार्यक्रम बंद करते" गौतमी पाटीलचा आयोजकांना थेट इशारा

अहमदनगरच्या नवनागापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला आहे.

नवशक्ती Web Desk

नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला आणि वाद झाला असं झालं नसेल तर नवलचं. काल (१ ऑगस्ट) रोजी अहमदनगरच्या नवनागापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला आहे. याच बरोबर या कार्यक्रमात दगडफेक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमात महिला देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात काही जणांनी हुल्लढबाजी केल्याने गौतमी पाटीलने हा कार्यक्रम अर्ध्यावरच अटोपला. तसंच आयोजकांकडून व्यवस्थित बंदोबस्त केला जाणार नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं.

अहमदनगरच्या नवनागापूरमध्ये गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना अचानक गोंधळ उडला. काही अतिउत्साही लोकांकडून यावेळी हुल्लडबाजी करण्यात आली. तसंच या कार्यक्रमात किरकोळ दगडफेक देखील झाली असून यात एक महिला किरकोल जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी गौतमी पाटीलने हा कार्यक्रम अर्ध्यावरच आटोपला तसंच कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करण्यार नसल्याची भूमिका घेतली. अहमदनगरमधील नागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात करण्यात आलं होतं.

काय म्हणाली गौतमी पाटील?

यावेळी कार्यक्रम रद्द करताना गौतमी पाटील म्हणाली की, "मी खूप दिवसांनी नृत्याचा कार्यक्रम करत होते. माझ्या कार्यक्रमाला खूप प्रेक्षक गर्दी करतात. अनेकदा समोर बसलेल्या प्रेक्षकांमुळे मागे बसलेल्यांना दिसत नाही. त्यामुळे गोंधळ होतो. आताही तेच झालं. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक आयोजकाला मला सांगायचं आहे की, बंदोबस्त व्यवस्थित करा. माझ्या कार्यक्रमात जर नेहमी गोंधळ होणार असेल तर इथून पुढे मी कार्यक्रम बंद करते, आणि खरचं करेल."

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश