मनोरंजन

Joram Trailer Released : मनोज वायपेयींच्या 'जोराम' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

यापूर्वी मनोज वायपेयी यांचे 'द फॅमिली मॅन' या सीरिजला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं.

नवशक्ती Web Desk

प्रसिद्ध अभिनेता मनोज वायपेयीचा कोणताही नवा चित्रपट अथवा वेबसीरिज आल्यास त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा घडत असते. तसंच त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील तसाच मिळतो. यापूर्वी मनोज वायपेयी यांचे 'द फॅमिली मॅन' या सीरिजला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. या सीरिजचे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. आता मनोज वाजपेयी यांच्या नव्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मनोज वापेयींचा आगामी 'जोराम' नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरची सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे. देवाशीष मखीजा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यापूर्वी जगभरात झालेल्या वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये 'जोराम' दाखवण्यात आला आहे. जगभरातील समीक्षक, परिक्षक आणि प्रेक्षकांनी त्याच भरभरुन कौतुक केलं आहे.

'जोराम' या सिनेमात मनोज वाजपेयी हा तीन वर्षाच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकरत आहे. जो आपल्या मुलीला वाचविण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरताना दिसतो. आपल्या मुलीसाठी तो काहीही करताना दिसत आहे. वेळप्रसंगी तो पोलिसांशी देखील लढा देताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

मखीजा फिल्मसच्यावतीनं झी स्टुडिओ द्वारा 'जोराम' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात स्मिता तांबे आणि मेघा माधूर या मराठी अभिनेत्रींचा देखील भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या आठ डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, "हा नियोजित कट, अशा वृत्तीला...

Google Update : जुना ईमेल आयडी बदलायचाय? आता गुगल देणार नवा पर्याय; जाणून घ्या नियम

लिबर्टी शोरूमने तुटलेल्या चप्पलीची वॉरंटी नाकारली; वाद थेट कोर्टात, मॅनेजरला होणार अटक

रानडुक्कराचा वन विभागाच्या पथकावर हल्ला; अधिकारी गंभीर जखमी; Video व्हायरल

पत्नी माहेरी जाते म्हणून पतीने चालवला सासरच्या घरावर बुलडोझर; “घरच उरणार नाही, मग...