मनोरंजन

Kangana Ranaut back on Twitter : तब्बल दीड वर्षांनी कंगना आली ट्विटरवर

काही महिन्यांपूर्वी ट्विटरकडून अभिनेत्री कंगना रानौतचे (Kangana Ranaut back on Twitter) ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते

प्रतिनिधी

अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) ही नेहमीच तिच्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असते. अशामध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती, तेव्हा तिने वेळोवेळी वादग्रस्त विधान करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. खासकरून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिने अनेकदा ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून टीका केली होती. यामुळे ट्विटरने गंभीर कारवाई करत तिचे ट्विटर अकाउंट बंद केले होते. अखेर तब्बल २० महिन्यांनंतर तिचे अकाउंट पुनर्संचयित करण्यात आले आहे. अशामध्ये आता ती पुन्हा एकदा त्याच आक्रमकतेने ट्विटरवर आपली मते व्यक्त करणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने ट्विट करत पुन्हा एकदा ती ट्विटरवर आल्याची माहिती दिली. तिच्या पहिल्याच ट्विटला अवघ्या अर्ध्या तासात ७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. "सर्वांना नमस्कार, ट्विटरवर परतल्यामुळे आनंद होत आहे." असे ट्विट तिने केले. त्यानंतर तिने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाची एक झलकदेखील शेअर केली. "इमर्जन्सी चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. आता २० ऑक्टोबर २०२३ला सिनेमागृहात भेटू" असे ट्विट करत तिने एक मेकिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल