कांतारा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अभिनेता ऋषभ शेट्टी तुफान लोकप्रिय झाला होता. कांतारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. यानंतर त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची मोठी चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी कांतारा चॅप्टर १ चा टीझर समोर आला आहे. तो चाहत्यांना आवडला आहे. कांताराच्या यशानंतर ऋषभ शेट्टीचं सर्व स्तरातून कौतूक केलं गेलं होतं. आता ऋषभ शेट्टी आणकी एका कारणाने चर्चेत आला आहे.
५४ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये ऋषभनं त्याच्या मुलाखतीतून एक मोठी बाब मांडली आहे. त्याने ओटीटी आणि ओटीटी मेकर्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने आपल्या मुलाखतीत म्हटलं की, ओटीटी प्लॅठफॉर्मचे मेकर्स हे कन्नड चित्रपटांना दुय्यम वागणूक देतात. कन्नड भाषेतील चित्रपट ज्या प्रमाणात ओटीटीवर प्रदर्शित व्हायला हवे ते होताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेक मोठे प्रश्न तयार झाले आहेत. त्यांनी कन्नड चित्रपटांना ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर भर द्यायला हवा. अन्यथा ओटीटीचे काही खरं नाही. अशा शब्दात त्यांनी आपली खदखद मांडली आहे.
ऋषभ शेट्टी म्हणाला की, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मेकर्स आणि निर्माते यांनी असं वागणं हे चांगले संकते नाही. कन्नड चित्रपटांना सहजासहजी ओटीटी प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. त्यामुळे त्या भाषेतील प्रेक्षकांची नाराजी आहे. कन्नडमध्ये देखील चांगला कंटेट असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. कोरोना काळात प्रेक्षकांचा ओटीटीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता ते मनमानी करत आहेत, असं देखील ऋषभ म्हणाला.