मनोरंजन

Kartik Aaryan Birthday : वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनने दिली सिद्धिविनायक मंदिराला भेट

वाढदिवसापूर्वी कार्तिक आर्यनने आयएफएफआय (IFFI) २०२२च्या उद्घाटनात आपल्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली.

वृत्तसंस्था

भारतीय स्टार कार्तिक आर्यनसाठी २०२२ हे वर्ष यशस्वी ठरले आहे यात शंका नाही. त्याच्या 'भूल भुलैया 2'या चित्रपटाने दर्शकांची मने जिंकली, तर दुसरीकडे या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला होता. एकेकाळी इंडस्ट्रीबाहेरचा असलेला हा सुपरस्टार आज बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय नावांपैकी एक बनला आहे.

वाढदिवसापूर्वी कार्तिक आर्यनने आयएफएफआय (IFFI) २०२२च्या उद्घाटनात आपल्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. आज सुपरस्टार कार्तिक आर्यनचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मुहूर्तावर कार्तिक आर्यन पांढऱ्या कुर्त्यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर येथे भेट देत बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसला.

कार्तिक आर्यनकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप काही आहे. 'धमाका'नंतर, कार्तिक आर्यनचा आगामी ओटिटी (OTT) चित्रपट 'फ्रेडी' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. त्यानंतर, कार्तिक आर्यन क्रिती सॅननसोबत अ‍ॅक्शन-एंटरटेनर ‘शेहजादा’ मध्ये दिसणार असून, हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, 'कॅप्टन इंडिया', 'सत्यप्रेम की कथा' आणि 'आशिकी ३' या चित्रपटांचाही भाग आहे.

Mumbai : सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याला वाढती मागणी; कुलाब्यात संस्थांचा पुढाकार; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर

ठाण्यातील हॉटेल,उद्योगांना दिलासा; LPG वाढीच्या आदेशाची अंमबजावणी करणार

मुंबई पालिकेकडून कंत्राटदारांना १,२४३ कोटींची आगाऊ रक्कम; सरकारची विधान परिषदेत माहिती

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखीची कसून पडताळणी करा; हायकोर्टाचे BMC, पोलिसांना सक्त निर्देश

उन्हाळा वाढणार, पाऊसही पडणार; राज्यभर यलो अलर्टचा इशारा