मनोरंजन

शाहिद कपूरच्या जुहूतील घरात भाड्याने राहणार कार्तिक आर्यन; भाडे ऐकून व्हाल चकित

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा जुहूच्या नवीन घरात भाड्याने राहणार असून भाडे ऐकून व्हाल चकित

प्रतिनिधी

बॉलिवूडमधील कार्तिक आर्यन आणि शाहिद कपूर या दोघांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. नुकतेच समोर आलेल्या बातमीनुसार, कार्तिक आर्यन हा शाहिद कपूरच्या जुहूच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहणार आहे. जुहूमध्ये शाहिद कपूरचा एक 'सी-फेसिंग' फ्लॅट आहे. पण याचे भाडे ऐकून तुमची थक्क व्हाल. कारण, या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी त्याला ड्रमहिना ७.५० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. या फ्लॅटचे ४५ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद कपूरने २०१४मध्ये जुहूतील प्रणेता बिल्डिंगमध्ये 'सी-फेसिंग' फ्लॅट गेहताला होता. या फ्लॅटमध्ये आता कार्तिक आर्यन भाड्याने राहणार आहे. ४५ लाख सिक्युरिटी डिपॉझिट आणि पहिल्या वर्षी ७.५० लाख प्रतिमहिना भाडे असणार आहे. दरवर्षी, ७ टक्क्याने या भांड्यामध्ये वाढ होणार आहे. या हिशोबाने, दुसऱ्या वर्षी ८.२० लाख आणि तिसऱ्या वर्षी ८.५८ लाख भाडे भरणार आहे. या फ्लॅटसोबत त्याला दोन चारचाकी पार्किंग स्लॉट देखील मिळणार आहेत.

अभिनेता शाहिद कपूरने मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकजवळ एक आलिशान घर ४ वर्षांपूर्वी विकत घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून या घराचे काम चालू होते. मिळालेल्या माहितीनुसार, या घराची किंमत अंदाजे ५८ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. वांद्रे वरळी सी-लिंकजवळ '३६०-वेस्‍ट' या बिल्डिंगच्या ४२व्या आणि ४३व्या मजल्यावर त्याचा हा ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास