मनोरंजन

'केनेडी' चित्रपटाचा कान्समध्ये शानदार प्रीमियर

अनुराग कश्यपसोबत सनी लिओन, राहुल भट उपस्थित

नवशक्ती Web Desk

फ्रान्समध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये 'केनेडी' चित्रपटाचं शानदार प्रीमियर पार पडला . अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' हा ज्युरींनी निवडलेला एकमेव भारतीय चित्रपट आहे.यावेळी सिनेमाची निवडक टीमदेखील उपस्थित होती. राहुल भट यात सनीसोबत प्रमुख भूमिकेत आहे.

या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. या चित्रपटाने प्रेक्षकांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळवले. अभिमानाने आनंद व्यक्त करत सनी लिओनी, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सह-कलाकार राहुल भट यांच्या सोबत कान्समध्ये खास फोटो पोझ दिली.

या प्रीमियरसाठी सनी लिओनने नाजा सादेने डिझाइन केलेला एक ब्लश गुलाबी वन-शोल्डर गाउन निवडला. कॉलरबोनवर नाजूक ब्रोचने सुशोभित केलेला गाऊन ने सनीचा ग्लॅमरस अंदाज दाखवला. सनीच्या रेड कार्पेट लूक ने प्रेक्षकांची मन जिंकली.

तिच्या लूकमध्ये ग्लॅमर तर आहेच ​​सनी लिओनीने स्वतःला हेलेना जॉयच्या उत्कृष्ट दागिन्यांनी अनोखा साज केला होता. हेलेना जॉयने डिझाइन केलेले सुंदर दागिने सनीवर उठून दिसत होते.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनीने फॅशन गेम सेट केला.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश