@kiranmane7777/X
मनोरंजन

"धर्मद्वेष पसरवणारी ही जी गद्दार पिलावळ आहेत..." अभिनेता किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Kiran Mane Viral Post: किरण यांनी जातीधर्मावरून सत्ताधारी पक्षाला खडेबोल सुनावले आहेत.

Tejashree Gaikwad

अभिनेते किरण माने हे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्यांनी अलीकडेच मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या घटनेवर मोठी पोस्ट लिहली होती. आता किरण यांनी जातीधर्मावरून सत्ताधारी पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. बदलापूर बलात्कार प्रकरण ते महाराजांचा कोसळलेला पुतळा या सर्व घटनांवरून किरण मानेंनी पोस्ट केली आहे.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

उदाहरणार्थ... बदलापूर बलात्कार प्रकरणात फरारी असलेला संस्थाचालक - तुषार आपटे. सोशल मिडीयावर एका बाईच्या जाळ्यात अडकून आपल्या देशाची संरक्षणविषयक अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला देणारा देशद्रोही - प्रदीप कुरूलकर. देशातल्या बॅंकिंग इतिहासातला सगळ्यात मोठा चौदा हजार करोडचा चुना लावून पळून गेलेला चोर - नीरव मोदी. तीन हजार महिलांवर बलात्कार करून परदेशात मजा मारत बसलेला सत्ताधारी पक्षाचा नेता - प्रज्वल रेवण्णा. शिवछत्रपतींच्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारात सामील होऊन पुतळा कोसळल्यावर लपून बसलेला मुर्तिकार - जयदीप आपटे. बंगालमधील कोलकाता रेप मर्डर केस मधला आरोपी - संजय राॅय.

...आणि आपल्या देशाला आणि महिलांना धोका वगैरे आहे म्हणे 'मुसलमानां'पासून !

हे काय आहे माहितीये? कृष्णा कुलकर्ण्यासारख्या ****** गद्दारी करून वार केला की 'वितभर पोटासाठी' आणि अफजलखानासारख्या हराम्यानं बगलेत दाबलं की 'तो मुस्लिम होता म्हणून.' असा बुद्धीभेद करणं आहे.

नीच नराधमांना जातधर्म नसतो !

अफजलखान असो वा कृष्णा... औरंग्या असो वा अनाजी... हे सगळे 'रयतेला' म्हणजेच कष्टकरी बहुजनांना झुकतं माप देणार्‍या शिवरायांच्या स्वप्नातल्या स्वराज्याचे दुश्मन होते. छत्रपतींनी कधीही जातधर्मावरून भेद केला नाही. त्यांचा खोटा जयजयकार करत धर्मद्वेष पसरवणारी ही जी गद्दार पिलावळ आहे, त्यांना या देशातल्या सर्वसामान्य रयतेला गुलाम बनवायचं आहे. या खरंतर छ. शिवरायांच्या शत्रूंच्याच अवलादी आहेत.

...म्हणून भावांनो, छत्रपतींना मानता ना? मग द्वेष करायचाच असेल तर कुठल्या जातीधर्माचा नव्हे, तर माणसामाणसात भेदभाव करणार्‍या कारस्थानी आणि कपटी 'वृत्ती'चा करा. जय शिवराय... जय भीम. - किरण माने.

किरण मानेंच्या पोस्ट खाली अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट्सवर त्यांचे चाहते, फॉलोअर्स त्यांच्या मताशी सहमत असल्याचे बोलताना दिसत आहे. अनेकांनी ही पोस्ट रिपोस्टही केली होती.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या