मनोरंजन

क्रांती रेडकरचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिलावहिला मराठी रिॲलिटी शो

एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण

प्रतिनिधी

निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे 'प्लॅनेट मराठी' पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच 'प्लॅनेट मराठी' आणि क्रांती रेडकर यांची निर्मिती संस्था 'दॅट हॅप्पी गर्ल' एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

वर्षपूर्तीनिमित्त मनोरंजक वेबफिल्म, वेबसिरीजच्या घोषणा होत असतानाच प्लॅनेट मराठीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे रिॲलिटी शोची. मराठी ओटीटीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. या शोची रूपरेखा नेमकी काय असणार, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. 'प्लॅनेट मराठी', अ व्हिस्टास कॅपिटल कंपनी नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण आशय घेऊन आले आहे, त्यामुळे हा रिॲलिटी शोही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर या शोबद्दल बोलताना म्हणतात, " प्रथमच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिॲलिटी शो सादर होणार आहे. क्रांती रेडकरच्या सोबतीने हा रिॲलिटी शो आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत. ही संकल्पना खूपच वेगळी असल्याने प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा यासाठी खूप उत्सुक आहोत. लवकरच यातील एकेक पैलू उलगडतील.''

पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम करताना मला एका चांगल्या ओटीटीसोबत काम करायचे होते. त्यामुळे 'प्लॅनेट मराठी' हाच मला योग्य पर्याय वाटला. मुळात 'प्लॅनेट मराठी' हे खूपच दूरदर्शी आहे. प्रेक्षकांची आवड ते उत्तम जाणतात. या शोच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी'सोबत सुरु झालेला माझा हा नवीन प्रवास नक्कीच अविस्मरणीय असणार. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून आम्ही अवघ्या महाराष्ट्रात पोहोचणार आहोत. यानिमित्ताने नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.'

- क्रांती रेडकर, निर्माती

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला