मनोरंजन

Filmfare Awards Marathi 2025 : क्षितीश दाते ठरला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर; 'या' भूमिकेसाठी मिळाला पहिला फिल्मफेअर!

मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा 'फिल्मफेअर मराठी' पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला, त्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता क्षितीश दाते याने.

Mayuri Gawade

मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा 'फिल्मफेअर मराठी' पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला, त्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता क्षितीश दाते याने. क्षितीश दाते याला ‘धर्मवीर 2’ चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर मराठी 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (Best Supporting Actor) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

‘धर्मवीर 2’ मध्ये क्षितीश दातेने माननीय एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेद्वारे त्याने एका राजकीय नेत्याचा प्रवास, संघर्ष आणि भावनिक बाजू प्रभावीपणे मांडली. या भूमिकेस प्रेक्षकांसोबतच समीक्षकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

हा क्षितीश दातेचा पहिलाच फिल्मफेअर पुरस्कार असून, त्यांच्या सशक्त अभिनय प्रवासातील तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सध्या क्षितीश दाते हॉटस्टारवरील ‘मिस्त्री’ या वेब शोमध्ये झळकत आहेत. याशिवाय, तो रंगमंचावरही सक्रिय असून ‘मी Vs मी’ हे नाटक सध्या रंगभूमीवर यशस्वीपणे सुरू आहे. आगामी काळातही क्षितीश वेगवेगळ्या माध्यमांतून नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

राज्यात दोन दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

...आणि आता तेलही! युद्धामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम

मुंबईची तुंबई होणार; मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदारच नाही, स्थायी समितीत सदस्य आक्रमक

LPG ची टंचाई कायमच; केंद्र सरकारची कबुली, PNG स्वीकारण्याचाही सल्ला