मनोरंजन

'लग्नकल्लोळ'चा धमाकेदार ट्रेलर रिलिज; कुणाच्या गळ्यात पडणार वरमाला? 'या' दिवशी येणार चित्रपटगृहात

'लग्न कल्लोळ' या चित्रपटाची चाहत्यांना फार उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला

Swapnil S

मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याचा आगामी 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाची चाहत्यांना फार उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा मराठी चित्रपट लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'या' दिवशी येणार चित्रपटगृहात-

लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ हा असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’ मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 1 मार्चला मिळणार आहेत. हा एक रॅामकॅाम चित्रपट आहे.

'लग्न कल्लोळ'ची तगडी स्टारकास्ट-

‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, आणि भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत