'आम्हाला एकटे सोडा', करीना कपूर पापाराझीवर भडकली आणि... FPJ
मनोरंजन

'आम्हाला एकटे सोडा', करीना कपूर पापाराझीवर भडकली आणि...

बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खानची पत्नी करीना कपूरने 'आम्हाला एकटे सोडा', अशा आशयाची एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकली. यामध्ये ती पापाराझींवर चांगलीच भडकलेली दिसत होती.

Kkhushi Niramish

बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खानची पत्नी करीना कपूरने 'आम्हाला एकटे सोडा', अशा आशयाची एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकली. यामध्ये ती पापाराझींवर चांगलीच भडकलेली दिसत होती. मात्र, तिने ही पोस्ट नंतर थोड्या वेळातच डिलिट केली. फ्री प्रेस जर्नल ने याविषयी माहिती दिली आहे. नेमकं काय कारण होतं पापाराझींवर भडकण्याचे?

काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. तेव्हापासून सैफ-करीना तसेच त्यांचे कुटुंबीय, वांद्रे येथील त्यांचे घर तसेच परिसरात होणाऱ्या सर्वच हालचालींवर माध्यमांद्वारे बातम्या देण्यात येत आहे. नुकतेच असाच एक व्हिडिओ शूट करणाऱ्या पापाराझींवर करीना भडकली.

...म्हणून करीना भडकली आणि पापाराझींना झापले

तैमुर आणि जेह यांना खेळण्यासाठी सैफ करिनाच्या घरी नवीन खेळणी आली. अशा आशयाची एक व्हिडिओ पोस्ट पापाराझींनी शूट केली होती. मीडिया पोर्टल्सवर ही पोस्ट पाहिल्यानंतर करीना कपूर चांगलीच भडकली. तिने पापाराझींना झापले व्हिडिओतील हेडलाइन वाचून करीना म्हणाली, ''थांबवा हे आता, तुम्हाला हृदय नाही का...आम्हाला एकटे सोडा.''

काही मिनिटांनी इन्स्टावरील पोस्ट केली डिलिट

पापाराझींवर भडकल्यानंतर करीनाने काही मिनिटांतच आपली एक ही पोस्ट डिलिट केली. त्यामुळे आता ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नाही.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली