Photo : Instagram (Manasi Naik)
मनोरंजन

युनिक युनिब्रो ते बॉबकट हेअरकट! मानसी नाईकचा '90s लुक' होतोय व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक कायमच आपल्या गाजलेल्या डान्स नंबरमुळे आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते. पण यावेळी ती कुठल्या चित्रपटामुळे नव्हे, तर तिच्या लहानपणीच्या खास आठवणींमुळे सोशल मीडियावर झळकतेय.

Mayuri Gawade

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक कायमच आपल्या गाजलेल्या डान्स नंबरमुळे आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते. पण यावेळी ती कुठल्या चित्रपटामुळे नव्हे, तर तिच्या लहानपणीच्या खास आठवणींमुळे सोशल मीडियावर झळकतेय.

मानसीने नुकताच तिच्या शाळेतील काळातला एक जुना फोटो शेअर केला आणि फॅन्सना थेट १९९८ च्या ‘कुछ कुछ होता है’ फेजमध्ये घेऊन गेली.

या फोटोमध्ये मानसीचा खास ‘अंजली’ लूक दिसत आहे. बॉबकट हेअरस्टाईल, ९०s स्टाइलचा टर्टल नेक टॉप, हाय वेस्ट जीन्स आणि चेहऱ्यावर गोडसर आत्मविश्वास. तिच्या या फोटोसोबत तिने लिहिलंय, "Anjali Haircut in my school days… Because dil se I’m a complete Anjali. And yes, I was unibrow!" तिच्या या थ्रोबॅक पोस्टमधून तिचं बालपण, त्या काळातले सिनेमाचे प्रभाव, आणि तिच्यामधल्या 'फिल्मी अंजली'ची झलकही दिसली.

इंस्टाग्रामवर 'कुछ कुछ होता है फिव्हर 1998' अशी हॅशटॅगसारखी कॅप्शन देत तिने जणू त्या चित्रपट प्रेमींच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या.

मानसी सध्या सुबोध भावेसोबत ‘सकाळ तर होऊ द्या’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार असून, मोठ्या ब्रेकनंतर तिला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई

"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप

चीनमधील कॉन्सर्टमध्ये रोबोट्सचा भन्नाट डान्स; एलन मस्क यांची एका शब्दात प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल