मनोरंजन

Mission Raniganj Trailer : 'ओएमजी-2' नंतर बॉक्स ऑफिस गाजवायला अक्षय सज्ज ; 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील नायक जसवंत सिंग गिलच्या जीवनावर आधारित असून अक्षय कुमारने चित्रपटात जसवंत गिलची भूमिका साकारली आहे.

नवशक्ती Web Desk

ओएमजी -२ नंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव' ची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील नायक जसवंत सिंग गिलच्या जीवनावर आधारित असून अक्षय कुमारने चित्रपटात जसवंत गिलची भूमिका साकारली आहे. आज 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव' या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर म्हणजे भावना, नाटक, प्रेरणा, धैर्य आणि शक्तिशाली संगीताची रोलर-कोस्टर राईड कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीसह सुंदरपणे विणलेली असल्याचं दिसून येत आहे.

'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत बचाव' सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. अल्पावधितच या ट्रेलरचा मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळत असून ते वाढतच जात आहेत. मिशनराणी गंजचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करत असल्याचं दिसून येत आहे. हा चित्रपट वास्तविक जीवनातील नायक जसवंत गिलच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. नोव्हेंबर 1989 मध्ये राणीगंजमधील पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना वाचवण्यासाठी त्यांनी कशाप्रकारे लढा दिला. हे या सिनेमात दाखवले जाणार आहे. या ट्रेलरमध्ये रेस्क्यू ऑपरेशनची दाखवलेली झलक अंगावर काटा आणणारी आहे.

सिनेप्रेक्षकांसह अक्षय कुमारचे चाहते या सिनेमाच्या ट्रेलरचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. या बाबत एका ट्विटर युजरने लिहिले की, 'अक्षय पुन्हा एकदा शक्तिशाली ट्रेलर घेऊन आला आहे. चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलताना एका चाहत्याने लिहिले की, '#MissionRaniganjचित्रपटाचे शीर्षक थ्रिल आणि रहस्याची भावना निर्माण करते, जे इतर कोणत्याही चित्रपटापेक्षा चांगले आहे.

या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार जसवंत गिलच्या भूमिकेत तर अभिनेत्री परिणीती चोप्रा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय कुमार आपल्या चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीच कमी पडत नाही. या चित्रपटात तो खूप दमदार परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. या सिनेमातील अक्षयच्या लुकने त्यांच्या चाहत्यांना प्रभावीत केलं आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली