मनोरंजन

वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चे कलेक्शन वाढता वाढता वाढे...

नवशक्ती Web Desk

'द केरला स्टोरी' हा चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ते चित्रपटगृहात प्रदर्शित होईपर्यंत त्याची चर्चा कायम आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावरही वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. अनेक कलाकार या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर काही ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

दरम्यान या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय भूमिका देखील समोर येत आहेत. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाचे शोज थांबवण्यात आले आहेत.

'द केरला स्टोरी' चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.3 कोटींची कमाई केली होती. दुस-या दिवशी या चित्रपटाने जवळपास रु. 12 कोटी. त्यासोबतच या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास 16.50 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 10.50 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर चित्रपटाचे पाचव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. दरम्यान, सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यात मुलींची कशी फसवणूक होते, हे वास्तव दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट केरळमधील दहशतवादी कारस्थानांवर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे, तर दुसरीकडे त्यावरून वाद सुरू आहे.

प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा प्रदर्शनानंतर मात्र बॉक्सऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. सतत चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाने भारतभरात धुमाकूळ घातला आहे.

देशभरात हा चित्रपट जवळपास १३०० स्क्रीन्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे स्क्रीन्स आणखी वाढतील अशीही चर्चा आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाचं कलेक्शन वाढत आहे. असं झालं तर कदाचित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' ला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक