मनोरंजन

Vadh Movie : अभिनेता संजय मिश्रा पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत; नवीन टीझर पोस्टर झाला प्रदर्शित

आगामी चित्रपट 'वध'चा (Vadh Movie) नवीन टीझर पोस्टर प्रदर्शित झाला असून संजय मिश्रा (Sanjay Mishra) साकारणार अनोखी भूमिका

वृत्तसंस्था

संजय मिश्रा (Sanjay Mishra) अभिनित 'वध' (Vadh Movie) या चित्रपटाची टीझर पोस्टरसह घोषणा झाली. या घोषणेनंतर संजय मिश्राला तीव्र भूमिकेत पाहण्यासाठी दर्शक उत्सुक आहेत. अशातच, निर्मात्यांनी या चित्रपटाचा आणखी एक टीझर पोस्टर प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये संजय मिश्राला एका अनोख्या आणि तीव्र अवतारात पाहायला मिळते.

या नवीन पोस्टरमध्ये, संजय मिश्राच्या चेहऱ्यावर तीव्रता दिसत असून, मनोहर कहानियां हे मासिक वाचताना पाहायला मिळते. यामुळे, या टीझर पोस्टरद्वारे निर्माते काय इशारा देण्याचा प्रयत्न करत आहेत यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. तसेच, थ्रिलर ड्रामाच्या शैलीत संजय मिश्रा यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकांची उकंठ वाढत आहे.

शिवाय, संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या उपस्थितीसह 'वध'हा निश्चितच एक विशेष चित्रपट असेल असे दिसते. 'वध'हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश