x
मनोरंजन

Nitesh Rane: "परत कोकण आणि हिंदूंबद्दल बोललास तर ..." नितेश राणेंची मुनव्वर फारुकीला वॉर्निंग

Munawar Faruqui on Konkani People: मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्यावर कोकणी लोकांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप होत आहे. यावरून नितेश राणेंनी त्याला सोशल मीडियावर चांगलंच झाडलं आहे.

Tejashree Gaikwad

Munawar Faruqui Viral Video: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुनव्वर फारुकीवर कोकणी लोकांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे. मुनव्वर फारुकी याच्या अपशब्दामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मुनव्वरने त्याच्या वक्तव्यासाठी माफीसुद्धा मागितली आहे. या नंतरही नितेश राणे यांनी पुन्हा असं केल्यास चांगलाच यांनी धडा शिकविला जाईल, असा मुनव्वरला इशारा दिला आहे.

भाजप नेते नितीश राणे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले की, "मुनव्वर नावाच्या हिरव्या सापाची जीभ खूप वळवळू लागली आहे. त्याला त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये आपल्या कोकणी लोकांची खिल्ली उडवायची खाज असेल तर त्याचा घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याला लवकरच मालवणी हिस्सा दाखवायला लागेल की पुढच्या स्टँडअप कॉमेडी हा मालवणीमध्ये करायला सुरु करेल. या हिरव्या सापाला सांगेल की, कोकणातल्या लोकांचा जर अपमान करायची हिम्मत तू करशील तर तुझ्यासारख्या हिरव्या सापांना पाकिस्तानमध्ये पाठवायला जास्त वेळ लागणार नाही. हे लक्षात ठेव."

" हे कोकणी लोक सगळ्यांना *** बनवतात.” हे वादग्रस्त विधान मुनव्वर फारुकीने केले होते.

अशाप्रकारे सगळ्या बाजूने होणारी टीका बघून अखेरीस मुनव्वर फारुकीने व्हिडीओ पोस्ट माफी मागितली. मुनव्वरचा हा व्हिडीओ रिपोस्ट करून नितीश राणे यांनी 'फटके खाण्याअगोदर सरळ झाला..परत कोकण आणि हिंदूंबद्दल बोललास तर ..डायरेक्ट अ‍ॅक्शन होईल ! जय कोकण... जय श्री राम.." असं कॅप्शन देत त्याला एका पद्धतीने वॉर्निंग दिली आहे.

मुनव्वर फारुकी 'बिग बॉस १७' चा विजेता

मुनव्वर फारुकी हा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहेत. २०२२ मध्ये रिॲलिटी टीव्ही शो 'लॉक अप १' जिंकून त्याने खूप लोकप्रियता मिळवली. त्याने २०२३ मध्ये ‘बिग बॉस १७’ मध्ये भाग घेतला आणि विजेता झाला.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री