मनोरंजन

Nora Fatehi Deepfake : डीपफेकचा प्रकार सुरुच, आता नोरा फतेही ठरली बळी; म्हणाली - "धक्कादायक...

Swapnil S

अभिनेत्री रश्मिका मंदाना, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्यांची मुलगी सारा तेंडुलकर आणि अभिनेता सोनू सूद नंतर आता नोरा फतेहीचाही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला या डीपफेक व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करताना, "धक्कादायक, ही मी नाही आहे, असे नोराने लिहिले आहे.

नोराच्या डीपफकेमध्ये काय आहे?

नोराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती एका फॅशन ब्रँडचे प्रमोशन करताना दिसत आहे. नोराचा व्हिडिओ एकदम परफेक्ट बनवला गेला आहे. या व्हिडिओमध्ये नोराचा चेहरा, आवाज आणि तिची बॉडी लँग्वेज डिजिटली एडिट करण्यात आली आहे. दुसरीकडे, 'एनडीटीव्ही'ने दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमागे असलेल्या फॅशन ब्रँडने सारे आरोप फेटाळून लावले आहेत. हा उपक्रम ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला संबोधित करण्यासाठी कंपनीने जाणीवपूर्वक केलेल्या जागरूकता मोहिमेचा एक भाग आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

डीपफेक म्हणजे काय आणि ते कसे बनवले जाते?

डीपफेक हा शब्द पहिल्यांदा २०१७ ला वापरला गेला. त्यानंतर अमेरिकेच्या सोशल न्यूज एग्रीगेटर रेडिटवर डीपफेक आयडी असलेल्या अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ पोस्ट केले गेले. त्यात एम्मा वॉटसन, गॅल गॅडॉट, स्कारलेट जोहानसन या अभिनेत्रींचे अनेक पॉर्न व्हिडिओ होते. खऱ्या व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओमध्ये दुसऱ्याचा चेहरा, आवाज आणि हावभाव फिट करणे याला डीपफेक म्हणतात. हे इतके स्पष्टपणे घडते की कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकेल. यामध्ये नकली देखील खऱ्यासारखे दिसते.

सचिन आणि सोनू सुदही डीपफेकचे शिकार -

अभिनेता सोनू सुदचाही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फसवणूक करणारा व्यक्ती लोकांना पैसे मागताना दिसत होता. सोनू सुदने व्हिडिओ शेअर करुन स्वत: याबाबतची माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी एका अॅपच्या जाहिरातीसाठी सचिन तेंडुलकरच्या डीपफेकचा वापर करण्यात आला होता. मात्र, सोनू सुदचे प्रकरण वेगळे होते. या डीपफेकमधून सामान्य लोकांकडून पैशाची मागणी केली जात होती. सोनू सुदच्या नावाने लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरु होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस