मनोरंजन

Nora Fatehi FIFA Performance : फिफा फॅनफेस्टमध्ये स्टेजवर नोराचा जलवा मात्र, व्हायरल व्हिडिओमुळे मोठा वाद

वृत्तसंस्था

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) फिफा वर्ल्ड कप 2022 (Fifa Worldcup 2022) मध्ये फिफा फॅनफेस्टमध्ये स्टेजवर डान्स केला. मात्र, सध्या नोरा फतेही मोठ्या वादात सापडली आहे. कारण तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण नोरावर टीका करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर नेटिझन्सनी नोराला लक्ष्य केले आहे. या व्हायरल व्हिडिओवरून नेटिझन्स नोरावर टीका करत आहेत. आता हे प्रकरण इतके वाढले आहे की अनेक जण नोराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करत आहेत.

फिफा फॅनफेस्टमध्ये नोराने ओ साकी साकी आणि नाच मेरी रानीवर डान्स केला. नोराने डान्स केल्यावर एका चाहत्याने तिला भारताचा तिरंगा दिला. मात्र, यावेळी नोराने तिरंगा ओढल्यासारखा वापरल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तिने तिरंग्याचा सन्मान न करता तिरंगा हातात रुमालासारखा धरला. हे पाहून नेटिझन्सचा संताप वाढला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता नोराच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या प्रकरणी नोरा काय स्पष्टीकरण देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल