मनोरंजन

Nora Fatehi : नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर केला दाखल केला मानहानीचा दावा; म्हणाली, 'माझे करिअर...'

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर (Jacqueline Fernandez) नोरा फतेहीने (Nora Fatehi) मानहानीचा दावा केला असून तिच्यावर आरोपदेखील केले आहेत

प्रतिनिधी

मनी लाँड्रिंग प्रकरणात गेले काही महिने प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही चांगलीच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ती सहआरोपी असल्याचा आरोप तिच्यावर आहे. तिने केलेल्या याचिकेमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही हिचेदेखील नाव आले होते. यावरून तिची कसून चौकशीदेखील झाली होती. आता नोराने जॅकलिन फर्नांडिसवर मानहानीचा दावा दाखल केला आहे. जॅकलिनने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

नोराने दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे की, "जॅकलिन फर्नांडिसने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्याबद्दल खोटे विधान केले जे अनावश्यक आणि अनुचित होते." याचसोबत तिने १५ मीडिया हाऊसविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला ‘ईडी’ने अटक केली. त्याचे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याशी त्याचे निकटचे संबंध असल्याचे ‘ईडी’ला आढळून आले होते. त्यानंतर या दोघींचीही चौकशी करण्यात आली होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत