मनोरंजन

धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक पैलू अजूनही गुलदस्त्यात आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी लोकांना माहीत नाहीत - मंगेश देसाई

सिनेमाच्या शेवटी आनंद दिघे यांचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागात नक्की काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना

प्रतिनिधी

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच या सिनेमाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता या चित्रपटाच्या वर्धापनदिनानिमित्त या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर मुक्कम पोस्ट ठाणे' या लोकप्रिय चित्रपटाचे शूटिंग 27 डिसेंबर 2021 रोजी कोलशेत येथे सुरू झाले. या चित्रपटाच्या वर्धापनदिनानिमित्त निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आनंद दिघे यांची अखंड राजकीय कारकीर्द धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात पाहायला मिळाली. या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघे यांचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागात नक्की काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

मंगेश देसाई पुढे म्हणाले, "धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक पैलू अजूनही गुलदस्त्यात आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी लोकांना माहीत नाहीत. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा अभिनेता आनंद दिघे ही ज्वलंत व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर साकारणाऱ्या प्रसाद ओक यांच्याकडे अभिनय कौशल्य आहे. प्रेक्षकांना ही जादू अनुभवायला मिळेल". 'धर्मवीर' चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून पहिल्या भागातील कलाकारांची फौज दुसऱ्या भागातही त्यांच्या पात्रांना न्याय देताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रवीण तरडे करणार आहेत. आता आनंद दिघे यांच्या मृत्यूचे गूढ उलगडणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी