मनोरंजन

दिवाळीत परिणीती चोप्राने दिली गोड बातमी! घरी गोंडस मुलाचे आगमन; राघव चड्ढा म्हणाले, "आता आमच्याकडे...

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या घरी दिवाळीच्या मुहूर्तावर गोंडस मुलाचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर शेअर करत दिली.

नेहा जाधव - तांबे

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या घरी दिवाळीच्या मुहूर्तावर गोंडस मुलाचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर शेअर करत दिली.

राघव यांनी लिहिलं, “आमच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. खरंच, यापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे आता आठवत नाहीये... त्याच्या येण्याने आमचं आयुष्य खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालं आहे. आधी आम्ही दोघं एकमेकांसाठी होतो, आणि आता आमच्याकडे सर्वकाही आहे.”

परिणीती आणि राघव यांनी यावर्षी ऑगस्टमध्ये एका खास पोस्टद्वारे ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. त्या पोस्टमध्ये "१+१=३" असं कॅप्शन आणि चिमुकल्या पावलांचे ठसे असलेला फोटो होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या जोडप्याचं लग्न सप्टेंबर २०२३ मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे शाही थाटामाटात पार पडलं होतं. लग्नाला दोन्ही क्षेत्रातील दिग्गज पाहुण्यांची उपस्थिती होती. परिणीतीने आपल्या लग्नाच्या लुकसाठी पारंपरिक सौंदर्य आणि एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ साकारला होता, तर राघवने पारंपरिक शेरवानीत रॉयल लूक सादर केला होता.

दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. राघव चड्ढा यांना त्यांच्या राजकीय योगदानासाठी आणि परिणीतीला अभिनयातील कार्यासाठी ब्रिटिश कौन्सिलकडून पुरस्कार मिळला होता. यानंतर दिल्लीतील भेटीत त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि 'चमकीला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या नात्याने प्रेमाचं रूप घेतलं.

दिवाळीच्या या आनंददायी पर्वावर या स्टार कपलच्या आयुष्यात नवीन प्रकाश उजळला आहे. चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. परिणीती आणि राघव यांच्या या नव्या प्रवासासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती

Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन

Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

रस्तेकामासाठी जड-अवजड वाहनांना बंदी; ७ डिसेंबरपासून जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी; संपूर्ण कर्जमाफी, भ्रष्टाचार, मतचोरीवरून सरकारला विरोधक घेरणार