मनोरंजन

'टाइमपास'मधील दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजू: साखरपुड्याची तारीख जाहीर करत चाहत्यांना दिले सरप्राइज

Swapnil S

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परबच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'टाइमपास' आणि 'टाइमपास ३' या चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणारा प्रथमेश लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. प्रेक्षकांचा लाडका दगडू त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे.

गेल्यावर्षी 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी त्याने एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तर काही दिवसांपूर्वीच त्यांने त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. आता त्याने साखरपुडा कधी करणार आहे हे सांगितले आहे. प्रथमेश आणि त्याची होणारी पत्नी क्षितिजा घोसाळकर यांनी एक पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची तारीख जाहीर केली आहे.

"14. 2. 2024, 'व्हॅलेंटाईन डे'चे आमच्या नात्यात खास स्थान आहे. म्हणजे आम्ही 'व्हॅलेंटाईन डे' वगैरे या कंसेप्टवर कधी फार विश्वास नाही ठेवायचो. नेहमीच्या दिवसा सारखाच तोही एक दिवस, त्यात इतके काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 माझी 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल फोटोशूट सीरिज बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. 14 फेब्रुवारी 2021- आमच्या नात्याला सुरुवात झाली. 14 फेब्रुवारी 2022- खूप आठवणींसह एक वर्ष पूर्ण झाले. 14 फेब्रुवारी 2023- आमच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर ऑफिशिअल अनाउन्स केले", अशी पोस्ट करत त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

यात त्यांनी पुढे लिहिले आहे की, "14 फेब्रुवारी 2024 ला आमच्या नात्याला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. मग आता काहीतरी खास केलेच पाहिजे ना!! म्हणून 14 फेब्रुवारी 2024 ला आम्ही साखरपुडा करायचे ठरवलंय. आम्ही आमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहोत. लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे बरं का."

त्यांनी केलेल्या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक केले आहे. तसेच त्यावर प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण

चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी संपली,राज्यातील ११ मतदारसंघात सोमवारी मतदान

महायुतीला मराठा समाज धडा शिकवेल,मनोज जरांगे पाटील यांचा इशारा