प्रिया बापटचा ‘असंभव’ लूक! मेकओव्हरचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क 
मनोरंजन

प्रिया बापटचा ‘असंभव’ लूक! मेकओव्हरचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क

मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडच्या काळात नवे विषय आणि धाडसी प्रयोग प्रेक्षकांना सतत आकर्षित करत आहेत. त्यातला नवीन प्रयोग म्हणजे ‘असंभव’ या चित्रपटातील प्रिया बापटचा जबरदस्त लूक. सोशल मीडियावर तिच्या मेकओव्हरचा व्हिडिओ व्हायरल होत असून, चाहत्यांनी 'अविश्वसनीय बदल!' असं म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Mayuri Gawade

मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे नवे विषय, धाडसी प्रयोग आणि दमदार भूमिका प्रेक्षकांना आकर्षित करीत आहेत. त्यात नुकताच प्रदर्शित झालेला ‘असंभव’ हा सिनेमा रहस्य, थरार आणि भावनिक वास्तव यांच्या सुरेख मिश्रणामुळे विशेष लक्षवेधी ठरत आहे. नैनितालच्या रम्य वातावरणात चित्रित झालेल्या या चित्रपटात सचित पाटील, मुक्ता बर्वे, संदीप कुलकर्णी आणि प्रिया बापट यांच्या प्रभावी भूमिका विशेष उठून दिसतात.

प्रिया बापटचा अनोखा मेकओव्हर

या चित्रपटातील सर्वांत चर्चेत असलेला भाग म्हणजे प्रिया बापटने साकारलेली ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेची भूमिका. पडद्यावर हे रूप आणण्यासाठी तिला दररोज तब्बल साडेतीन तासांचा मेकअप करावा लागत असे.

आपल्या अनुभवाबद्दल प्रिया सांगते, "कलाकार म्हणून सतत नवीन काहीतरी करण्याची इच्छा असते. एका भूमिकेचे दोन वेगवेगळे वयोगट साकारणे ही दुर्मिळ संधी होती. साधना सैगल या पात्रासाठी मी ३५ वर्षांची महिला आणि नंतर ७५ वर्षांची वृद्ध स्त्री, असे दोन्ही टप्पे जगले."

ती पुढे सांगते, "मेकअपमुळे इतकं बदललेलं रूप घेऊन कॅमेऱ्यासमोर उभं राहणं हा वेगळाच अनुभव होता. ७५ वर्षांची स्त्री कशी चालते, तिचा आवाज कसा असेल, देहबोलीत काय बदल होतात हे सगळं शिकून रिहर्सल करत मी स्वतःला त्या वयात नेणं हा अविश्वसनीय प्रवास होता."

प्रेक्षक आणि कलाकारांकडून कौतुक

प्रियाच्या मेहनतीचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. 'तू कमाल एफर्ट्स घेतलेस', 'तुझा अभिमान वाटतो' अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर सतत उमटत आहेत.

२१ नोव्हेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेल्या ‘असंभव’ला कथानक, अभिनय आणि तांत्रिक गुणवत्तेमुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत असून, प्रिया बापटची भूमिका विशेष चर्चेत आहे.

गौरी गर्जे प्रकरणात मोठा ट्विस्ट; दोघांच्या अंगावर जखमा, अनंत गर्जेच्या पोलिस कोठडीत वाढ

६ महिन्यांचा संसार, कौमार्य चाचणी अन् पतीचे अफेअर; नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं जीवन

Disha Salian's Death Case : पाच वर्ष उलटले तरी किती वेळ चौकशी करणार? हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

कोकणात राणे बंधू वाद टोकाला; निलेश राणेंच्या स्टींग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "हमाम में तो सब...

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार