मनोरंजन

प्रसिद्ध गायक कैलाश खेर घेणार रेडियो सिटी सुपर सिंगर सीझन १४च्या प्रतिभावंत गायकांचा शोध

वृत्तसंस्था

भारतातील आघाडीचे रेडियो नेटवर्क रेडियो सिटी ‘रेडियो सिटी सुपर सिंगर’ कार्यक्रमाचा सीझन १४ लवकरच सुरु होत आहे. एक दशकापेक्षा अधिक काळ भारतीय लोकांना वेड लावणाऱ्या सर्वात मोठ्या गायन प्रतिभा शोध स्पर्धेचे यंदा १४ वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. देशभरातील होतकरू गायकांना सर्वात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता ‘रेडियो सिटी सुपर सिंगर’ ओळखली जाते. रेडियो उद्योगात गायन प्रतिभा स्पर्धेची सुरुवात करणारे म्हणून रेडियो सिटीला ओळखले जाते. यंदाची स्पर्धेची टॅगलाईन ‘अगर है म्युजिक से प्यार, तो बनो सिटी के अगले सिंगिंग स्टार’ही असून त्याद्वारे आपला वारसा कायम राखण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.

सर्वोत्कृष्ट गायकांचा शोध घेऊन त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी तयार करण्यासाठी भारताचे सुफी गायक म्हणून ओळखले जाणारे कैलाश खेर हे मार्गदर्शक म्हणून सलग तिसऱ्या वर्षी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. देशभरातील गायन प्रतिभा सादर करण्याच्या १३ यशस्वी सीझननंतर रेडियो सिटी सुपर सिंगरचा सीझन १४ ऑन-एअर आणि ऑन-ग्राउंड कार्यक्रमांसह सर्व प्रमुख डिजिटल व्यासपीठांवरही आपली उपस्थिती सशक्त करणार आहे. याच्या ऑडिशन्स ६ डिसेंबरपासून सुरू होतील. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या किंवा गायन करण्याची व आपली प्रतिभा दाखविण्याची आंतरिक इच्छा असलेले कोणीही स्त्री वा पुरुष हे या स्पर्धेचा लक्ष्यीत वर्ग आहे. याच्या व्होटिंग लाईन्स १८ ते २० डिसेंबर खुल्या असतील आणि रेडियो सिटी सुपर सिंगरचा अंतिम सामना हा २१ ते २३ डिसेंबरला घेण्याचे नियोजन आहे. प्रत्येक मार्केटमधील सर्वोत्तम ५ गायकांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि प्रत्येक मार्केटमधील विजेता व उपविजेत्यांची घोषणा केली जाईल.

रेडियो सिटी सुपर सिंगरच्या सीझन १४ च्या आरंभाबद्दल बोलताना रेडियो सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशित कुकियान म्हणाले, "रेडियो सिटी सुपर सिंगरच्या सीझन १४च्या आरंभाची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. देशभरातील होतकरू गायकांना पुढे येऊन आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करण्याची संधी देण्याची आमची कटिबद्धता आहे.

रेडियो सिटी सुपर सिंगरचा भाग बनल्याबद्दल उत्साह व्यक्त करताना कैलाश खेर म्हणाले, ``माझा रेडियो सिटी सुपर सिंगरशी गेल्या दोन सीजनपासून संबंध आहे आणि यंदाही, ऑडिशन्ससाठी भारतभरातील सर्वोत्कृष्ट गायकांचा शोध आम्ही घेऊ. सर्वोत्कृष्ट गायकांचा शोध घेमे आणि त्यांना रेडियो सिटीसोबत स्टारडमसाठी तयार करणे, हीच एक मोठी कामगिरी आहे. रेडियो सिटी सुपर सिंगरच्या सीझन १४ मध्ये उत्कृष्ट सहभागी आणि शहरकेंद्रित फिनाले होण्याची मला अपेक्षा आहे."

रेडिओ सिटी सुपर सिंगर ३९ शहरांमध्ये एकमेव गायन प्रतिभा शोध स्पर्धा आहे आणि यात प्रत्येक शहराला स्वतःचा सुपर सिंगर मिळतो, हा या उपक्रमाचा सर्वात आश्वासक पैलू आहे. विशेष म्हणजे, एथर एनर्जी हे या वर्षीच्या रेडिओ सिटी सुपर सिंगरचे शीर्षक प्रायोजक आहेत. रेडिओ सिटी सुपर सिंगरच्या १४व्या सीझनचा रेडिओ, डिजिटल आणि ऑन-ग्राउंड कार्यक्रमांतही मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जाईल. यासाठी सहभागी https://www.radiocity.in/radiocitysupersinger ला भेट देऊन नोंदणी करू शकतात.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!