शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त पती राज कुंद्राची खास पोस्ट; 'माझी देवी' म्हणत शेअर केला Video (Photo-Instagram)
मनोरंजन

शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त पती राज कुंद्राची खास पोस्ट; 'माझी देवी' म्हणत शेअर केला Video

या व्हिडीओमध्ये शिल्पाचे विविध पारंपरिक आणि आधुनिक लूकमधील फोटोही पाहायला मिळाले. व्हिडीओच्या शेवटी राजने...

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री आणि उद्योजिका शिल्पा शेट्टी आज (दि.८) तिचा ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त पती राज कुंद्राने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट शेअर करत शिल्पावरील प्रेम आणि आदर व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये राजने शिल्पाला त्याची "देवी" म्हणत तिच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणांचे कौतुक केले आहे.

शिल्पाच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक

पारंपरिक वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा वेगळ्या अंदाजातील या व्हिडीओमध्ये शिल्पाची ताकद, संयम, करुणा आणि सकारात्मकता यांवर भर देण्यात आला आहे. आपल्या कुटुंबीयांच्या आयुष्यात आनंद, प्रेरणा आणि स्थैर्य देणारी व्यक्ती म्हणून तिचे वर्णन करण्यात आले.

या व्हिडीओमध्ये शिल्पाचे विविध पारंपरिक आणि आधुनिक लूकमधील फोटोही पाहायला मिळाले. व्हिडीओच्या शेवटी राजने शिल्पाला "देवी" संबोधत तिच्या आगामी आयुष्यासाठी आनंद, प्रेम आणि आशीर्वादांच्या शुभेच्छा दिल्या.

राज कुंद्राची भावनिक पोस्ट

राज कुंद्राने पोस्टमध्ये लिहिले, "यावर्षीची वाढदिवसाची पोस्ट काहीशी वेगळी आहे. साजरे केलेले क्षण किंवा उत्सव याबद्दल नाही. तर तू माझ्या आयुष्यात नेमकी काय आहेस आणि कशाचे प्रतीक आहेस याबद्दल आहे. आयुष्य कठीण झाल्यावर तू ताकद असतेस. भावना ओसंडून वाहतात तेव्हा संयम असतेस. सर्व काही अनिश्चित वाटते तेव्हा श्रद्धा असतेस आणि अंधाऱ्या काळातही प्रकाश असतेस. तू नेहमीच देवीची ऊर्जा बाळगली आहेस, जपणारी, संरक्षण करणारी, माफ करणारी आणि त्याचवेळी प्रचंड मजबूत. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, माझ्या प्रिय. माँ तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करो.”

२००९ मध्ये बांधली लग्नगाठ

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये विवाह केला. व्यावसायिक ओळखीमधून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. या दाम्पत्याला वियान राज कुंद्रा आणि समीशा शेट्टी कुंद्रा ही दोन मुले आहेत.

तीन दशकांची यशस्वी कारकीर्द

शिल्पा शेट्टीने १९९३ मध्ये शाहरुख खानसोबत 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी', 'धडकन', 'रिश्ते', 'फिर मिलेंगे' आणि 'लाइफ इन अ... मेट्रो' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.

अलिकडच्या काळात शिल्पाने 'हंगामा २' आणि 'सुखी' या चित्रपटांमधून पुनरागमन केले. अभिनयासोबतच ती विविध डान्स आणि रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही लोकप्रिय आहे.

आगामी चित्रपटात झळकणार

शिल्पा शेट्टी शेवटची रोहित शेट्टी यांच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती. ती लवकरच ‘केडी : द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ध्रुव सरजा, संजय दत्त, व्ही. रविचंद्रन, रमेश अरविंद, रीश्मा नानैया, जिशू सेनगुप्ता आणि नोरा फतेही यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

मुंबई ‘मेट्रो-१’, १२ वर्षे, १२५ कोटी प्रवासी