मनोरंजन

Bigg Boss Marathi 6 : ‘माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं’; चर्चांना पूर्णविराम देत राखी सावंतची वाइल्ड कार्ड एंट्री

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी ६’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. घरात तयार झालेली नाती, गटबाजी, रणनीती आणि समज-गैरसमज यामुळे खेळ एका विशिष्ट दिशेने जात असतानाच राखी सावंतची एंट्री म्हणजे थेट गेमचं गणित बदलणारी ठरणार आहे.

Mayuri Gawade

ड्रामा, धक्का आणि धमाका… या तीन शब्दांशी एक नाव कायम जोडलेलं असतं, ते म्हणजे राखी सावंत. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये राखी सावंत येणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर अंदाज, चाहत्यांच्या पोस्ट्स, तर कधी अफवांचा बाजार… पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर बिग बॉस मराठीच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री राखी सावंतची होणार असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे.

घरातील गेमवर होणार मोठा परिणाम

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी ६’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. घरात तयार झालेली नाती, गटबाजी, रणनीती आणि समज-गैरसमज यामुळे खेळ एका विशिष्ट दिशेने जात असतानाच राखी सावंतची एंट्री म्हणजे थेट गेमचं गणित बदलणारी ठरणार आहे. आतापर्यंत तयार झालेली समीकरणं, ठरलेले गट आणि सुरक्षित वाटणारे खेळाडू… सगळ्यांसाठी ही एंट्री धक्का देणारी ठरू शकते.

कोणाशी मैत्री करायची, कोणावर थेट हल्ला करायचा आणि कोणाच्या नसा दाबायच्या, हे राखीच्या खेळात कायम अनपेक्षित असतं

"राखी जाणार आणि गेम पालटणार"...राखी सावंतची प्रतिक्रिया

आपल्या एंट्रीबद्दल बोलताना राखी म्हणाली, "राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेले की सगळ्यांचा आवाज गायब होतो. माझीच मर्जी चालते आणि मी घरात धम्माल करणार आहे. वेगवेगळे कॉस्च्युम्स आणि माझा वेगळा गेम प्रेक्षकांना पाहायला मिळेल," असं राखीने स्पष्ट केलं.

यासोबतच तिने शोचा होस्ट रितेश देशमुख याचंही भरभरून कौतुक केलं. "रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बिग बॉस मराठी चालतो आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे," असं राखी सावंतने सांगितलं.

आधीच होती एंट्रीची चाहूल

विशेष म्हणजे, राखी सावंतच्या एंट्रीची चाहूल ही फार आधीपासून लागली होती. सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट्स, विविध मीडिया रिपोर्ट्स आणि चाहत्यांच्या चर्चांमुळे तिच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आता ती प्रत्यक्षात घरात येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता पुढे काय होणार हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

एसटीची 'ग्रुप ऑफर' हिट! गणेशोत्सवासाठी ३० टक्के अधिभार रद्द केल्याने कोकणासाठी ५,१८४ बसेस फुल्ल

समृद्धी महामार्ग होणार 'स्मार्ट'! AI कॅमेऱ्यांच्या उभारणीला सुरुवात; नागपूरपासून २५० किमीच्या टप्प्यांत काम

Mumbai : चर्चेविना २० हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर; विरोधकांचा सभागृहातून सभात्याग; महापालिका सभागृहाबाहेर प्रतिसभागृह

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर शौचालयांचा अभाव; नगरसेवकांचा सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल

Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक