Ramayana Teaser : रणबीरचा राम अवतार पाहून चाहते भारावले; आलियानेही केलं कौतुक, म्हणाली - "जगावेगळी गोष्ट" 
मनोरंजन

Ramayana Teaser : रणबीरचा राम अवतार पाहून चाहते भारावले; आलियानेही केलं कौतुक, म्हणाली - "जगावेगळी गोष्ट"

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘रामायण’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम अवतार चर्चेत आहे. भव्य VFX आणि सेट्सनी प्रेक्षकांना भारावून टाकलं आहे. दरम्यान, आलिया भट्टनेही रणबीरच्या कामाचं कौतुक करत चाहत्यांना चित्रपटाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

Mayuri Gawade

हनुमान जयंतीच्या औचित्याने बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातील भव्य मांडणी, दमदार VFX आणि रणबीर कपूरचा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील तेजस्वी अवतार पाहून चाहते भारावून गेले आहेत. या झलकवर आलिया भट्टनेही कौतुकाची थाप देत रणबीरच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं आहे.

नेमकं काय पाहायला मिळतं टीझरमध्ये?

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’चा ‘रामा’ नावाचा हा पहिला टीझर प्रेक्षकांसमोर आला आहे. या झलकेत रणबीर कपूर अयोध्येचा शांत, संयमी आणि तेजस्वी राजकुमार म्हणून पाहायला मिळतो.

टीझरमध्ये राजा दशरथांकडून वनवासाची आज्ञा मिळाल्याचा प्रसंग, तसेच सीता आणि लक्ष्मणासोबतचा प्रवास अशा महत्त्वाच्या घटनांची झलक दाखवण्यात आली आहे. शेवटी प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांचं दृश्य विशेष लक्ष वेधून घेतं.

भव्य सेट आणि जबरदस्त VFXची झलक

या चित्रपटात भव्य सेट, दमदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि उच्च दर्जाचा VFX पाहायला मिळतो. पुष्पक विमानासारख्या दृश्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आठ वेळा ऑस्कर विजेता VFX स्टुडिओ DNEG आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे.

आलिया भट्टनं केलं रणबीर कपूरचं कौतुक

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीच्या दिवशी, २ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी आधीच दिली होती. त्यानुसार टीझर रिलीज झाल्यानंतर आलिया भट्टनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो शेअर केला.

चाहत्यांशी संवाद साधताना आलियाने रणबीर कपूरच्या कामाचं कौतुक करत म्हटलं, "त्यानं खूप उत्तम काम केलं आहे. तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा यासाठी मी खूप उत्सुक आहे. खूपच जगावेगळी गोष्ट आहे ही." तसंच तिने चाहत्यांना चित्रपटाला पाठिंबा देण्याचं आवाहन करत “कृपया चित्रपटाला भरभरून पाठिंबा द्या,” असंही सांगितलं.

आलियाच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर तिच्या पाठिंब्याचं कौतुक होत असून, अनेकांनी तिला ‘supportive wife’ म्हणूनही गौरवलं आहे.

‘रामायण’ चित्रपटाचा टीझर येथे पाहा

चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अंगावर काटा आला”, “याला म्हणतात टीझर”, “रणबीर कपूरचा लूक कमाल आहे”, “हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.

दोन भागांत प्रदर्शित होणार चित्रपट

‘रामायण’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बीग बजेट चित्रपटांपैकी एक मानला जात असून, दोन्ही भागांचं बजेट सुमारे ४ हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. रणबीर कपूरसह साई पल्लवी, यश, सनी देओल, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह या कलाकारांची यात प्रमुख भूमिका आहे.

हा भव्य पौराणिक चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६मध्ये आणि दुसरा भाग दिवाळी २०२७मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mumbai : मेट्रो ९ आणि २बीसाठी आणखी प्रतीक्षा! उद्घाटन पुढे ढकलले; पॉड टॅक्सी, ठाणे-बोरिवली बोगदा कामालाही विलंब

Mumbai : प्रवाशांना दिलासा! मेट्रो ३ वर नवे प्रवेशद्वार सुरू; 'या' प्रमुख स्थानकांवर सुविधा

मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी, मच्छीमारांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी झेप

भारतीय रेल्वेची पहिली ‘डिजिटल रिफंड’ मोहीम सुरू; १० दिवसांत ६८ टक्के प्रकरणांचा निपटारा, QR कोडमुळे घरबसल्या परतावा

मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडीचे दालन खुले; PHD अभ्यासक्रमाला विद्या परिषदेची मंजुरी