मनोरंजन

रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील व्हिडिओ व्हायरल ; 'या' मराठी अभिनेत्रीच्या कमेंटने वेधलं लक्ष

या व्हिडिओत रणवीरच्या फिटनेस आणि हॉट अंदाज पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत त्याचं कौतुक केलंय

नवशक्ती Web Desk

अभिनेता रणवीर सिंग हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चांगलाचं चर्चेत आहे.

रणवीरने या चित्रपटात 'रॉकी रंधावा' हे पात्र साकारत आहे. त्याच्या 'रॉकी रंधावा' या पात्राची ओळख करुन देणारा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या मधून रॉकी रंधावा याची डॅशिंग झलक दाखवण्यात आली आहे. रणवीरच्या फिटनेस आणि हॉट अंदाज पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत त्याचं कौतुक केलंय.

रणवीरने इंस्टग्रामवर त्याचा हा व्हिडीओ पोस्ट करताना 'रॉकी रंधावाचे मंडे मोटिव्हेशन' असं कॅप्शन दिलं आहे. या पूर्ण व्हिडिओत रणवीरचा हॉट आणि डॅशिंग लुक पाहायला मिळत आहे. त्याचा या व्हिडिओवर त्याची पत्नी दीपिकासह अनेक सेलिब्रेटींनी त्याचं कौतुक करत कमेंटचा वर्षाव केला आहे. या सगळ्यांमध्ये एका मराठी अभिनेत्रीने केलेल्या कमेंटने सगळयांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मरोठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने रणवीरच्या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त करत "स्क्रीन इज ऑन फायर, हॉट", अशी कमेंट केली आहे. अमृता खानविलकर आणि रणवीर सिंग हे दोघे अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. अमृताने आतापर्यंत केलेले सिनेमे, डान्स परफॉर्मन्स याचं रणवीर न चूकता कौतुक करत असतो.

त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट येत्या २८ जुलैला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिमेमात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. याशिवाय शबाना आझमी, जया बच्चन, धर्मेंद्र, या दिग्गजांनी सुध्दा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ७ वर्षांनी करण जोहरने पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी