रश्मिका मंदानाने पुन्हा वेधलं लक्ष; जपानमधील ब्लॅक गाऊन लूक व्हायरल 
मनोरंजन

रश्मिका मंदानाने पुन्हा वेधलं लक्ष; जपानमधील ब्लॅक गाऊन लूक व्हायरल

हॉलिवूड अभिनेता विन्स्टन ड्युकसोबत स्टेज शेअर करताना रश्मिकाने एलिगन्स आणि स्टेटमेंट ज्वेलरीचा सुंदर मिलाफ सादर केला.

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या जागतिक फॅशन विश्वात आपला खास ठसा उमटवत आहे. बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील रेड कार्पेट लूकनंतर आता रश्मिकाने जपानमधील टोकियो येथे आयोजित 'क्रंचीरोल ॲनिमे अवॉर्ड्स २०२६' मध्ये आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हॉलिवूड अभिनेता विन्स्टन ड्युकसोबत स्टेज शेअर करताना रश्मिकाने एलिगन्स आणि स्टेटमेंट ज्वेलरीचा सुंदर मिलाफ सादर केला. तिच्या या लूकची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

ब्लॅक गाऊनमध्ये रश्मिकाचा ग्लॅमरस लूक

२३ मे रोजी पार पडलेल्या या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी रश्मिकाने डिझायनर प्रबल गुरूंगचा ब्लॅक सिक्विन्ड गाऊन परिधान केला होता. स्ट्रॅपलेस असलेल्या या गाऊनमध्ये फिटेड स्ट्रक्चर, क्लीन नेकलाइन आणि फ्लोअर-लेंथ देण्यात आली होती. हा गाऊन तिच्या व्यक्तिमत्त्वाला अत्यंत आकर्षक दिसत होता.

फ्लोरल एम्बेलिशमेंटने वाढवली लूकची शोभा

या संपूर्ण आउटफिटमधील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे गाऊनवरील फ्लोरल नक्षी. नाजूक डिटेलिंगमुळे ऑल-ब्लॅक लूकला सॉफ्ट आणि रोमँटिक टच मिळाला. या डिझाइनमुळे गाऊनचा मोनोक्रोम लूक अधिक उठून दिसत होता.

ज्वेलरीने जिंकली मनं

रश्मिकाने या गाऊनसोबत सुनिता शेखावत यांची आकर्षक ज्वेलरी परिधान केली होती. तिने घातलेला मल्टी-जेमस्टोन चोकर संपूर्ण लूकचा मुख्य आकर्षण ठरला. ऑल-ब्लॅक आउटफिटवर या रंगीबेरंगी ज्वेलरीमुळे खास कॉन्ट्रास्ट तयार झाला. याशिवाय तिने नाजूक रिंग्स परिधान करत ज्वेलरी स्टाईलिंग बॅलन्स केले.

सॉफ्ट ग्लॅम मेकअपने पूर्ण केला लूक

सेलिब्रिटी स्टायलिस्ट प्रियंका कापडिया आणि नाहिदा यांनी रश्मिकाचा हा लूक स्टाईल केला होता. रश्मिकाने मेकअप सॉफ्ट, ग्लॅमरस आणि क्लासिक ठेवला होता. ग्लोईंग ड्युई स्किन, सौम्य स्मोकी आईज, सॉफ्ट ब्लश्ड चीक्स आणि ग्लॉसी न्यूड लिप्समुळे तिचा संपूर्ण लूक अधिक खुलून दिसत होता. तिने केस साइड पार्टेड वेव्ह्समध्ये स्टाईल केले होते, ज्यामुळे तिच्या लूकला विंटेज सिनेमॅटिक चार्म मिळाला.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी