मनोरंजन

रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या

डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकाने तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच, व्हिडिओ पाहून ती खरोखर दुखावली असल्याचे तिने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते.

Rakesh Mali

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आज(20 जानेवारी) आंध्र प्रदेशातून या आरोपीला अटक केली. डीसीपी हेमंत तिवारी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रश्मिकाचा नोव्हेंबर 2023 मध्ये एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगावरुन अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत ब्रिटिश-भारतीय इन्फ्ल्युएन्सर झारा पटेल काळ्या रंगाच्या ड्रेसमध्य़े लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसत होती. आरोपीने या व्हिडिओत झाराच्या जागी रश्मिकाचा चेहरा लावला होता. यासाठी आरोपीने एआय तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यानंतर अनेकजण रश्मिकाच्या मागे भक्कमपणे उभे राहिले होते. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत कारवाईची मागणी केली होती.

तर, डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकाने तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच, व्हिडिओ पाहून ती खरोखर दुखावली असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते.

सचिन तेंडुलकरही डीपफेकचा बळी-

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही एक डीपफेक व्हिडिओ या आठवड्यात सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओमध्ये, सचिन मुलगी सारा तेंडुलकरचे उदाहरण देत, एका ऑनलाइन गेमचा प्रचार करताना दिसत होता.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल