मनोरंजन

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा अडकले विवाहबंधनात; 'VIROSH' च्या लग्नाची चाहत्यांत चर्चा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. जस्थानमधील उदयपूरपासून सुमारे २५ किमी लांब निसर्गरम्य अरावलीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या ITC Mementos रिझॉर्टमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडला.

Mayuri Gawade

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील उदयपूरपासून सुमारे २५ किमी लांब निसर्गरम्य अरावलीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या ITC Mementos रिझॉर्टमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडला. लग्नाला दोघांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीमधील काही मोजकीच मित्रमंडळी उपस्थित होती. लग्नाची जय्यत तयारी २४ फेब्रुवारीपासूनच सुरू झाली होती, असं समजतंय.

सकाळी विजयच्या कुटुंबाच्या तेलुगू परंपरेनुसार विवाहविधी संपन्न झाले. त्यानंतर संध्याकाळी रश्मिकाच्या कोडाव परंपरेनुसार पुन्हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवस हा लग्नसोहळा चालणार असल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांनुसार, वरमाला घालतानाचा क्षण हा सर्वात भावनिक क्षण ठरला. एकमेकांना वरमाला घालताच ते दोघेही भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

कोडाव परंपरेनुसार विवाहावेळी रश्मिका तिच्या आईचे दागिने घालणार आहे. हे तेच दागिने आहेत जे तिच्या आईने स्वतःच्या लग्नात परिधान केले होते. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दोघांचा साखरपूडा झाला होता, मात्र याबाबत दोघांनीही कमालीची गुप्तता बाळगली होती. मात्र, बोटातील अंगठीमुळे चाहत्यांमध्ये चर्चा कायम होती. अखेर आज चाहत्यांचा अंदाज खरा ठरला.

‘VIROSH’ नावाने खास घोषणा

काही दिवस आधीच दोघांनी सोशल मीडियावर एक संयुक्त पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. "तुम्ही आम्हाला 'VIROSH' हे नाव दिलंत, म्हणून आमच्या या एकत्र येण्याला आम्ही 'द वेडिंग ऑफ VIROSH' असं नाव देत आहोत," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. या घोषणेनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

'गीता गोविंदम'पासून सुरू झालेली ओळख

रश्मिका आणि विजय यांची 'गीता गोविंदम' या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगत राहिल्या; मात्र दोघांनी अधिकृत कबुली दिली नव्हती.

प्री-वेडिंग सोहळेही हटके

पारंपरिक हळद आणि संगीतसोबतच पूल पार्टी तसेच क्रिकेट सामन्याचाही समावेश प्री-वेडिंग कार्यक्रमात होता. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याला ग्लॅमरसोबतच मैत्रीपूर्ण रंगही लाभला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्राद्वारे या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सकाळच्या विधीनंतर या जोडप्याच्या टीमकडून माध्यम प्रतिनिधींना मिठाई वाटण्यात आली. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, विवाहाचे अधिकृत छायाचित्रे आणि व्हिडिओ दोघांकडून अद्याप शेअर करण्यात आलेले नाहीत. विवाहसोहळ्याचे अधिकृत फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

सणासुदीत पारंपरिक पेहरावाची क्रेझ; पंजाबी सूट, अनारकली अन् एथनिक गाऊन ठरतोय हिट

अंबानींच्या गणेशोत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी; आलिया-रणबीर, कियारा-सिद्धार्थसह स्टार कपल्सच्या फॅशनची चर्चा

गणेशोत्सवासाठी जिनिलीयाचा मराठमोळा लूक; साडीपासून दागिन्यांपर्यंत सगळंच सुंदर, एकदा फोटो पाहाच

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार