मनोरंजन

Richa Chadha:'ते' फोटो शेअर करताच रिचा चड्ढाने बंद केलं कमेंट सेक्शन; म्हणाली - 'मी पोस्ट केलेली ही सर्वात खासगी बाब'

अभिनेत्री रिचा चढ्ढा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. नुकतीच तिने केलेल्या पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Tejashree Gaikwad

अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने 'हीरामंडी' या तिच्या वेब सिरीजमधील तिच्या अभिनयासाठी खूप टाळ्या मिळवल्या. करियरमध्ये उत्तम यश मिळाल्यानंतर, रिचा नवीन भूमिका घेण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच रिचा आई होणार आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल ऑगस्टमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. अलीकडे रिचाने पती अली फजलसह तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमधील फोटो टाकले. पण याच पोस्टमुळे रिचा फारच चर्चेत आली आहे.

१६ जून रोजी, रिचाने भावनिक नोटसह इंस्टाग्रामवर तिचे आणि अलीचे सोबतचे फोटो शेअर केले. तिने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, “एवढं निर्मळ प्रेम जगाला प्रकाशाच्या किरणा शिवाय दुसरं काय देऊ शकतं? अली या सुंदर प्रवासात तू माझा सोबती झालास त्याबद्दल धन्यवाद. आम्ही नकारात्मकतेवर मात करणारं, करुणा व सहानुभूती असलेलं आणि सर्वांना भरभरून प्रेम देणारं बाळ या जगात आणू अशी आम्हाला आशा आहे. आमेन!” पुढे तिने संस्कृतमध्ये लिहले की,

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

या तिच्या पोस्ट वरील कमेंट सेक्शन मात्र रिचाने बंद केलं. यामुळेच ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिने कमेंट सेक्शन बंद करण्यामागचे कारण सांगितले की, "ही मी पोस्ट केलेली सर्वात खासगी गोष्ट आहे, त्यामुळे कमेंट्स बंद केल्या आहेत.”

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची प्रेमकहाणी 'फुकरे' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. दोघेही या सेटवरच पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. रिचाला पहिल्यांदा भेटताच अली तिच्या प्रेमात पडला होता, पण रिचाने अलीला आधी प्रपोज केले होते. २०१७ मध्ये त्यांनी आपल्या नात्याबद्दल सर्वांना सांगितले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली