मनोरंजन

Rishi Saxena: तब्बल ६ वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात ऋषी सक्सेनाचं दमदार पुनरागमन

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा ऋषी सक्सेना साकारताना दिसणार आहे.

Tejashree Gaikwad

Marathi Serial Update: स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. आई कुठे काय करते मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला, "स्टार प्रवाहसोबत काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. खरतर खूप दिवसांपासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. आई कुठे काय करते मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आलं आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच भावली. जवळपास ६ वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करतोय. शूटिंगच्या पहिल्या दिवशी थोडं टेन्शन होतं. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलसं करुन घेतलं. आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं आहे. हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील याची खात्री आहे."

आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी