मनोरंजन

रोहीत चव्हाण आणि तेजस बर्वेची जोडी जमली, ‘गजानना’ गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Tejas Barve, Rohit Chavan: मिसेस मुख्यमंत्री फेम तेजस बर्वे दिग्दर्शित आणि चला हवा येऊ द्या फेम रोहीत चव्हाण यांचं ‘गजानना’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Tejashree Gaikwad

New song: बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. अश्यातच मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेता तेजस बर्वेने दिग्दर्शित केलेलं ‘गजानना’ गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला अनुश्री फिल्म्सवर पाहायला मिळेल. या गाण्याची निर्मिती अनुश्री फिल्म्स आणि मयूर तातुसकर यांनी केली आहे. चला हवा येऊ द्या फेम ‘रोहीत चव्हाण’ हा मुख्य कलाकाराच्या भूमिकेत असून अक्षय आणि कांचन वाटवे हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शकाची धुरा मिसेस मुख्यमंत्री फेम तेजस बर्वे यांनी सांभाळली आहे. या गाण्याचं संगीत मयूर बहुळकर यांनी केलं असून गीतरचना प्रणव बापट यांची आहे. अनुश्री फिल्म्सची या आधी लढला मावळा रं.., भाव भक्ती विठोबा, पंढरीची आई, तु सखा श्रीहरी, देवा गणेशा अशी गाणी प्रसिद्ध झाली आहेत.

अभिनेता - दिग्दर्शक तेजस बर्वे पदार्पणाविषयी आणि गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतात, “माझं आणि बाप्पाचं नातं खूप जवळचं आहे. मी बाप्पाचा लाडका आहे असं लहानपणापासून मला वाटतं. मी बाप्पाच्या आगमनाला ढोल वाजवायचो. त्यासाठी मी खास ढोलपथक जॉइन केलेलं. मला अभिनयानंतर दिग्दर्शन करायची इच्छा होती आणि मला बाप्पापासूनच करायची होती. आणि तसचं घडलं स्वप्नपूर्ती झाली आणि माझ्या नवीन कामाचं श्री गणेशा या गाण्यापासून होतोय. एका मूर्तिकाराची आणि बाप्पाची भावनिक कथा सांगण्याचा यातून मी प्रयत्न केला आहे. या गाण्याचा शेवटचा सीन शूट करताना सेटवरील सर्वजण भावूक झाले होते. मी लहानपणी गणपती विसर्जनासाठी घाटावर गेलो होतो तेव्हा एक लहान मुलगी खूप रडत होती. त्याचवेळी मला या गाण्याची संकल्पना सुचली. आणि बाप्पाप्रति भावना मी यात मांडली. प्रेक्षकांना आमचं गाणं आवडतंय. आमच्या सर्व गाण्यांवर असंच प्रेम असू द्या हीच सदिच्छा.”

निर्माते मयूर तातुसकर गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगताना म्हणतात, “गाण्याची संकल्पना साकारण्यामागे खूपच वेगळा विचार होता. गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या काळात, आपण प्रचंड उत्साह आणि भक्तिमय वातावरण अनुभवतो. परंतु, या गाण्यात आम्ही भक्ताच्या बाप्पा प्रति असलेली भक्तीची भावनिक व्याख्या सादर केली आहे. आमचा उद्देश होता की, हे गाणं आजच्या तरुणाईसाठीही समर्पक असावं, त्यामुळे गाण्याच्या संकल्पनेत पारंपारिकतेसोबत कथेचा वापर करण्यात आला. यामध्ये संगीताची ऊर्जा आणि गाण्याचे शब्द, हे दोन्ही आपल्याला भक्तीच्या नव्या उंचीवर घेऊन जातात. एक सीन होता ज्यामध्ये मुख्य कलाकार रोहित चव्हाण हे गणेशाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करीत होते. त्या क्षणी, वातावरणात अशी काही आध्यात्मिकता आणि ऊर्जा निर्माण झाली की, सगळेच जण भावनिक झाले. अशाच एका सीनमध्ये दिग्दर्शक तेजस बर्वे यांनी, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, हे मिश्रण केलं, यातील काही भाग स्क्रिप्टमध्ये नव्हता, परंतु त्या क्षणात इतका प्रभावशाली ठरला की, आम्ही तो सीन गाण्यात कायम ठेवला. ‘गजानना’ या गाण्यानंतर आम्ही वेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहोत, ज्यामध्ये इतिहासाशी संबंधित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास दाखवणारी एक डॉक्युमेंटरी-ड्रामा असेल. अनुश्री फिल्म्स प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन कलाकृती घेऊन येतील. तुम्हा सर्वांचं प्रेम कायम असंच राहो.”

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत