देशभरात मराठीचा डंका! रोहित राऊत ठरला‘I-Popstar’ विजेता; पत्नी जुईलीची खास पोस्ट चर्चेत  
मनोरंजन

देशभरात मराठीचा डंका! रोहित राऊत ठरला‘I-Popstar’ विजेता; पत्नी जुईलीची खास पोस्ट चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून 'I-Popstar' या संगीत रिॲलिटी शोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगत होती. अखेर बहुप्रतीक्षित फिनालेचा क्षण समोर आला, ज्यात मराठमोळ्या रोहित राऊतनं विजेतेपदाची कमान आपल्या खांद्यावर घेतली.

Mayuri Gawade

गेल्या काही दिवसांपासून 'I-Popstar' या संगीत रिॲलिटी शोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगत होती. अखेर बहुप्रतीक्षित फिनालेचा क्षण समोर आला, ज्यात मराठमोळ्या रोहित राऊतनं विजेतेपदाची कमान आपल्या खांद्यावर घेतली. अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होणाऱ्या देशातील पहिल्या इंडी-पॉप शोमध्ये रोहितनं आपल्या खास आवाजाने आणि दमदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली.

सहा आठवड्यांच्या या प्रवासात ८५ हून अधिक ओरिजनल गाणी सादर झाली. देशभरातील तरुण कलाकारांनी आपली कला दाखवताना या शोला नवा ऊर्जा मिळवून दिली. फिनालेमध्ये टीम किंगचा रिषभ पांचाल आणि टीम परमिशचा रोहित राऊत यांच्यात चुरस पाहायला मिळाली आणि रोहितला पहिल्या 'I-Popstar' विजेत्याचा मान मिळाला. यावेळी ७ लाख रुपयांचं बक्षीस त्याला प्रदान करण्यात आलं. रिषभ पांचाल रनर-अप ठरला आणि त्याला ३ लाखांचं पारितोषिक देण्यात आलं.

"हा किताब प्रत्येक प्रादेशिक कलाकारासाठी" - रोहित राऊत

विजयानंतर आनंद व्यक्त करत रोहित म्हणाला, "या मंचावर येऊन मी कलाकार म्हणून माझी खरी ओळख शोधली. चाहत्यांच्या प्रेमामुळे आणि माझे मेंटॉर परमिश पाजींच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. हा किताब मी प्रत्येक प्रादेशिक कलाकाराला समर्पित करतो, जो आपल्या चौकटीच्या बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याचं स्वप्न पाहतो."

परमिश वर्मांनीही रोहितच्या मेहनतीचं कौतुक करतं म्हटलं की, "रोहितची प्रगती आणि त्याचा जोश पहिल्या दिवसापासून जाणवत होता. तो प्रत्येक आठवड्यात स्वतःला अधिक उंचीवर घेऊन गेला. हा विजय आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे."

"ही तर फक्त सुरुवात" - पत्नी जुईलीची भावूक पोस्ट

रोहितच्या विजयानंतर सगळ्यांचेच लक्ष गेलं ते त्याची पत्नी जुईली जोगळेकर हिच्या खास पोस्टकडे. तिनं रोहितच्या स्ट्रगलपासून ते फिनालेपर्यंतच्या सर्व प्रवासातली त्याची मेहनत उलगडत लिहिलं, "आज मला तुझा प्रचंड अभिमान आहे. रात्र-रात्र जागून केलेल्या परिश्रमाचं फळ अखेर मिळालं. फिनालेच्या शेवटच्या आठवड्यात अनेक गाणी नाकारली गेली तरी तू हार मानली नाहीस. आज स्टेजवर तू ज्या ताकदीने परफॉर्म केलंस, तो तुझा खरा विजय आहे." शेवटी तिनं हेही म्हटलं, "ही तर फक्त सुरुवात आहे. पुढचा प्रवास अजून मोठा असणार आहे."

'रोअर ऑफ सह्याद्री' सारख्या गाजलेल्या गाण्यांमुळे आणि सातत्यपूर्ण परफॉर्मन्समुळे रोहितनं पुन्हा एकदा रिॲलिटी शोच्या मंचावर मराठी मुलाचं नाव उजळवलं आहे. त्याच्या विजयावर महाराष्ट्रभरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Voter ID नसेल तर मतदान कसं करायचं? जाणून घ्या 'ही' महत्त्वाची माहिती

Mumbai : घर कुठंय तुझं? बाईकस्वार तरुणीला ट्रॅफिक सिग्नलवर त्रासदायक अनुभव; सोशल मीडियावर शेअर केला Video

‘नको घेऊ ऑर्डर, मीच खातो!’; दरवाजापर्यंत डिलिव्हरीवरून वाद, झोमॅटो रायडरने स्वतःच फस्त केलं जेवण, Video व्हायरल

रस्त्यात सापडली ४५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग; सफाई कर्मचारी महिलेने जे केलं ते सगळ्यांना शक्य नाही!

Mumbai : हार्बरवर एसी लोकलचं पुनरागमन! २६ जानेवारीपासून सेवा पुन्हा सुरू; १४ फेऱ्यांचं संपूर्ण वेळापत्रक बघा एकाच क्लिकवर